आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानांची १२ हजार फुटांहून सूर मारत शहिदांना श्रद्धांजली! ऑपरेशन सफेद सागरच्या २० व्या वर्षपूर्ती निमित्त ‘आकाश गंगा’ टीमची जिगरबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ उधमपूर - छायाचित्र स्काय गंगा स्कायडायव्हर्सचे आहे. भारतीय हवाई दलाने हे छायाचित्र जारी  केले आहे. ऑपरेशन सफेद सागरला बुधवारी २० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आग्र्यामध्ये विंग कमांडर के.बी.एस. सन्याल यांच्या नेतृत्वाखाली स्कायडायव्हर्सने १२ हजार फुटांच्या उंचीवरून उडी घेऊन कारगिलमधील शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचे हवाई दलाने बुधवारी सांगितले. पाकिस्तानी सेनेने कारगिलमध्ये घुसखाेरी करून ताबा घेतल्यानंतर २५ मे १९९९ला भारतीय हवाई दलाला आक्रमण करण्याचे आदेश देण्यात आले हाेते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सकाळी ६.३० वाजता हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागरअंतर्गत  आक्रमण केले. हा हल्ला  मिग-२१, मिग-२७ एमएल आणि मिग-२३ बीएन  या लढाऊ विमानांच्या मदतीने माेहीम फत्ते करण्यात आली.

 

गोरखा जवानांकडून सुमारे १७२० फूट शिखरावर सहकाऱ्यांचे स्मरण 
कारगिल युद्धात १० जुलै ९९ला रायफल्सने बटालिकमधील  खलुबर रिजलाइनच्या पाॅइंट ५१९० वर भीषण हल्ला करून मुक्त केले हाेते.  जय महाकाली, आयाे गाेर्खाली अशी रायफल्सची घाेषणा हाेती. गोरखा रायफल्सच्या या यशस्वी हल्ल्याला बुधवारी २० वर्षे झाली. यानिमित्त बटालिक सेक्टरमध्ये १,७२० फूट उंचीवर जाऊन सैनिकांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.


६० दिवस सुरू हाेते ‘सफेद सागर’, शत्रूचे ३०० जवान लढाईत ठार 
> हवाई दलाचे कारगिलच्या १८ हजार फूट उंचीवरील ऑपरेशन सफेद सागर २६  मे १९९९ राेजी सुरू झाले हाेते. सीमा पार करू नका असा सरकारने हवाई दलाला आदेश दिलेला असल्याने हे ऑपरेशन काहीसे कठीण हाेते.

> शत्रूला केवळ ५ ते १२ कि.मी.  परिघात लक्ष्य करायचे हाेते. हवाई दलाने मिग २१, मिग-२३, मिग-२७, मिग-२९ विमानांच्या मदतीने बीव्हीआर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.