आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्याची विशेष संधी, जुळून आला खास योग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (22 ऑक्टोबर) सोम प्रदोषचा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. हा योग अश्विन मासात जुळून आल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्रदोष तिथीच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि उपाय केले जाऊ शकतात. 


प्रदोष म्हणजे काय
शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षात जेव्हा त्रयोदशी ही तिथी येते त्या दिवसाला प्रदोष म्हणतात. हाच प्रदोष जर सोमवारी आला तर त्याला सोमप्रदोष, मंगळवारी आल्यास भौमप्रदोष व शनिवारी आल्यास शनिप्रदोष म्हणतात. येथे जाणून घ्या, या शुभ योगात कशाप्रकारे करावी शिव पूजा आणि उपाय...


व्रत आणि पूजन विधी
पाणी न पिता प्रदोष व्रत करावे. सकाळी स्नान केल्यानंतर शंकर-पार्वती आणि नंदीला पंचामृत, गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर बेलाचे पान, गंध, फुल, अक्षता, अर्पण करून धूप-दीप लावून नावैद्य दाखवून पूजा करावी. संध्याकाळी पुन्हा स्नान करून अशाच प्रकारे महादेवाची पूजा करावी. महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आठ दिशांना आठ दिवे लावावेत. प्रत्येक दिवा लावल्यानंतर महादेवाला नमस्कार करावा. शिव स्तोत्र, मंत्राचा जप करावा. रात्री जागरण करावे. अशाप्रकारे सर्व इच्छापूर्ती आणि कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रदोष व्रताच्या धार्मिक विधानाचे नियम आणि संयमाने पालन करावे.


जाणून घ्या, शिव पुराणात सांगण्यात आलेले उपाय..
1. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनलाभ होतो.
2. महादेवाला गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते.
3. महादेवाला मोगऱ्याचे फुल अर्पण केल्याने सुदंर पत्नी मिळते.
4. तल्लख बुद्धिसाठी साखर मिश्रित दुधाने महादेवाचा अभिषेक करावा.
5. महादेवाला दुर्वा अर्पण केल्याने आयुष्य वाढते.

बातम्या आणखी आहेत...