Home | International | Other Country | Somali school office bomb blast news and updates

Bomb Blast: सोमालियात शाळा, सरकारी कार्यालयावर हल्ला; किमान 14 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 04:20 PM IST

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या स्फोटाच्या व्हिडिओमध्ये कित्येक किमी दूरपर्यंत स्फोटाचा धूर दिसून येत होता.

  • मोगादिशू - सोमालियाच्या राजधानीत सरकारी कार्यालयास लक्ष्य करून घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात शाळेतही मोठे नुकसान झाले. मोगादिशूत रविवारी दुपारी झालेल्या या स्फोटात किमान 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. हा बॉम्बस्फोट इतका भीषण होता की सरकारी इमारतीवर झालेल्या हल्ल्यात शाळेची इमारत आणि आसपासच्या घरांसह मशीदीचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या स्फोटाच्या व्हिडिओमध्ये कित्येक किमी दूरपर्यंत स्फोटाचा धूर दिसून येत होता.

    अल-शबाबने घेतली हल्ल्याची जबाबदारी

    आफ्रिका खंडातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना अल-शबाबने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोमालिया दहशतवाद आणि गृहयुद्धाला सामोरे जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, हा हल्ला आत्मघातकी होता. हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन जिल्हा कार्यालयावर धडकवले आणि मोठा स्फोट झाला. सोमालियात 1991 मध्ये लष्करशाही सरकारला उखडून फेकण्यात आले. त्या लष्करशाही सरकारचा नेता मोहम्मद सिआद बारने आपल्या विरोधी गटांविरुद्ध हल्ले सुरू केले. तेव्हापासूनच सोमालिया अशांत आहे. याच संघर्षांत सोमालियाचा पुंटलंड वेगळा झाला आहे. सोमालियात संयुक्त राष्ट्रने 2012 मध्ये सरकारची स्थापना केली. यानंतर शहरांमधून तर दहशतवादी पळून गेले. मात्र, ग्रामीण भागांमध्ये अजुनही संघर्ष सुरूच आहे.

  • Somali school office bomb blast news and updates
  • Somali school office bomb blast news and updates
  • Somali school office bomb blast news and updates
  • Somali school office bomb blast news and updates
  • Somali school office bomb blast news and updates

Trending