आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी वडिलांसाठी तर कोणी पुत्रासाठी प्रचारात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी : या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात दुसरी पिढी मोठ्या इच्छा आकांक्षेने भवितव्य अजमाविण्याकरिता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गंमत म्हणजे मातब्बर प्रतिस्पर्धींच्या या प्रचार युद्धाला तीन पिढ्या जुंपल्या आहेत. चारही मतदारसंघात मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवतीसह मुले, मुली, सुना, नातवंडे, भाऊ वगैरे अख्खे कुटुंबच प्रचार युद्धात आहे. काहींनी व्यवस्थापनात्मक कामांची जबाबदारी स्वीकारली आहे. 


गंगाखेड विधानसभा मतदारसंघात माजी आ.सिताराम घनदाट हे रिंगणात आहेत. त्यांचे सुपुत्र मोहन घनदाट प्रचारात दंग आहेत. जि. प. सदस्य मामाचे नातू भरत घनदाट हे दोन तालुक्यांत फिरत आहेत. विद्यमान आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या सौभाग्यवती उर्मिला केंद्रे, त्यांचे सुपुत्र मिथिलेश केंद्रे तसेच कन्या व नातवंडेही प्रचारात व्यग्र आहेत. पाथरीत आ.मोहन फड यांच्याकरिता वडील माधवराव फड हे मोर्चेबांधणीत दंग आहेत. फड यांचे सुपुत्रही दुसरी बाजू सांभाळत आहेत. फड यांच्या सौभाग्यवती मेघा फड याही प्रचारात सक्रिय आहेत. ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या सौभाग्यवती महापौर मीना वरपूडकर, मुलगा समशेर वरपूडकर, सून प्रेरणा वरपूडकर, बंधू विजय वरपूडकर तसेच वरपूडकर कुटुंबातील त्यांचे पुतणे, सुना, नातवंडेही प्रचारात उतरले आहेत.

परभणीत महायुतीचे डॉ.राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे वडील माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील यांनी गाठीभेटीचे सत्र सुरू केले आहे. सौभाग्यवती संप्रिया पाटील चार-सहा महिन्यांपासून दौरे करीत आहेत.

अख्खे कुटुंब प्रचारात
जिंतूरमधून आ. विजय भांबळे यांच्या निवडणूक प्रचारात त्यांचे वडील माजी मंत्री माणिकराव भांबळे, सौभाग्यवती वंदना विजय भांबळे, कन्या प्रेक्षा भांबळे, भाऊ प्रमोद भांबळे, पृथ्वीराज भांबळे असे एकूण तीन पिढ्या गुंतल्या आहेत. ज्येष्ठ नेते माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर त्यांच्या सौभाग्यवती मीनाताई बोर्डीकर हे दोघे कन्या मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या विजयाकरिता प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत. त्यांचे बंधू गंगाधर बोर्डीकर व अन्य नातेगोते प्रचारयुद्धात दंग आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...