आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काही मागण्या मान्य; शासनाकडील मागण्यांसाठी आंदोलन सुरू ठेवणार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थी आक्रमक, बेमुदत धरणे
  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिफारस

परभणी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपुर्वी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर बुधवारी(दि.५) या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. दरम्यान, बुधवारी सकाळी विद्यापीठ प्रशासनाने स्थानिक पातळीवरील कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीतील मागण्या  लेखी स्वरूपात मान्य केल्या. शासन स्तरावरील मागण्या विषयी पाठपुरावा सुरू असल्याचेही  सांगितले. मात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह कृषी पदवीला व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा देण्याच्या मागण्यांवर आंदोलन सुरूच ठेवले आहे. कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक मागण्यांसंदर्भात कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांना सोमवारी(दि.तीन) निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीत विद्यापीठ स्तरावरील ज्या मागण्या मान्य करणे शक्य आहे त्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असा खुलासा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. ज्या मागण्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद तसेच राज्य शासनाकडील आहेत त्याबाबत विद्यापीठ पाठपुरावा करीत असल्याचे नमूद केले. स्थानिक मागण्यांवर कारवाई

स्थानिक पातळीवरील मागण्यांमध्ये २०१९ मध्ये कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश देण्यात येणार. रॅगिंग रोखण्यासाठी संवाद समिती स्थापन करण्यात येणार. उद्यानविद्या महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य देण्यासंदर्भात योग्य तो निर्णय देण्यात येणार आहे. वसतिगृहात विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व पंखे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोलार वॉटर हिटरची दुरुस्ती करण्यात आलेली असून नवीन सोलार वॉटर हिटर खरेदीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार स्वागत व निरोप सभारंभाव्यतिरिक्त आणखी एक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. व्यायामशाळेतील बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश बंद करून व्यायाम शाळेतील वस्तूंची संख्या वाढवण्यात येणार आहे. सर्व विषयातील रिक्त पदे भरतीची प्रक्रिया सुरू आहे. 

 

व्यावसायिक  अभ्यासक्रमासाठी शिफारस :


भाजप सरकारच्या काळात २२ जानेवारी २०१९ रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा, विद्यार्थ्यांच्या मागणीवर विद्यापीठ प्रशासनाने ही मागणी राज्य शासनाच्या अखत्यारीतील बाब आहे. १२ मार्च २०१९ रोजी कृषी परिषदेच्या ९८ व्या बैठकीत पदव्युत्तर अभ्यासक्रम व्यावसायिक करण्याची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. तर ३१ डिसेंबर २०१९ रोजी कृषी पदव्युुत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमांनाही व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्याची शिफारस विद्यापीठाने केली असल्याचे कुलसचिवांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.वाढीव शुल्कावर एमसीआरला प्रस्ताव

वाढीव शुल्का संबंधीची मागणी ही बाब महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील बाब आहे. इतर राज्यातील शैक्षणिक शुल्कासंबंधी आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या मागणीबाबतचा प्रस्ताव संशोधन परिषदेकडे सादर करण्यात येणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...