आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे : लेफ्टी असण्याचे कारण आणि बरेच काही वाचा रंजक Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - दरवर्षी 13 ऑगस्टला इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे साजरा केला जातो. जगभरात जवळपास 10 पैकी एक व्यक्ती लेफ्ट हँडर असतो. ब्रायन लारा, माइकल बेवन, सुरैश रैना, युवराज सिंह और सौरभ गांगुली या क्रिकेटर्सचे उदाहरण पाहता लेफ्टी लोक चांगले खेळाडू होतात, असे म्हटले झाले. काही संशोधनानुसार लेफ्ट हँडर्सच्या मेंदूचे काही फंक्शन वेगळे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे लोक क्रिएटिव्ह आणि अभ्यासातही हुशार असतात. चार्ली चॅप्लिन, लिओनार्दो दा विंची, अल्बर्ट आइनस्टाइन, अमिताभ बच्चन असे लेफ्ट हँडर्स जगप्रसिद्ध आहेत. 


का असतात लेफ्ट हँडर्स...
संशोधक सांगतात की, व्यक्ती जेनेटिक्स किंवा आसपासच्या वातावरणामुळे लेफ्टी असतात. काही अभ्यास आणि संशोधनांमध्ये इतरही काही फॅक्ट समोर आले आहेत. त्या फॅक्टवरून आम्ही तुम्हाला लेफ्ट हँडर्सबाबत काही खास माहिती सांगणार आहोत. 

(सोर्स : येल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास यूएसए आणि सेंटर फॉर ह्यूमन जेनेटिक्स, हार्वर्ड युनिव्हर्सिटी यू.के. रिसर्च)

 

- जास्त क्रिएटिव्ह असतात?
असे समजले जाते की, लेफ्टी लोक जास्त क्रिएटिव्ह असतात. पण संशोधनानुासर क्रिएटिव्हिटीचा लेफ्ट किंवा राइट हँडर असण्याशी संबंध नाही. 

 

- जेनेटिक असते का?
शास्त्रज्ञांना अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, काही लोक लेफ्टी का असतात. पण एका फॅक्टनुसार चारपैकी एका प्रकरणात हे जिन्मुळे म्हणजे अनुवांशिक असते. 

 

- लेफ्टी लोक मेंदुचा उजवा भाग वापरतात?
न्यूझीलंडच्या व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार फक्त 30 टक्के लेफ्ट हँडर्स लॅंग्वेज प्रोसेससाठी मेंदूच्या उजव्या पार्टचा वापर करतात. 70 टक्के लेफ्टी लेफ्ट पार्टचा वापर करतात. 

 

- लेफ्टी असल्याचा अभ्यासावर परिणाम होतो?
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार लेफ्ट हँडर मुले शाळेत राइट हँडर्सच्या तुलनेत रीडींग, रायटिंग, सोशल डेव्हलपमेंट सारख्या गोष्टींत मागे राहतात. 

 

- लेफ्टी खेळात पुढे असतात?
टेनिस, क्रिकेट, बॉक्सिंग, बेसबॉल अशा अनेक खेळांत लेफ्टी चांगली कामगिरी करतात. टॉप टेनिस प्लेयर्समध्ये 40 टक्के जास्त लेफ्टी आहेत. 

 

- प्रेग्नेंसीशी याचा संबंध आहे ?
एक ब्रिटिश स्टडीनुसार प्रेग्नंसीदरम्यान स्ट्रेसमुळे मुले लेफ्टी असल्याची शक्यता अधिक असते. कमी वजनाची किंवा जास्त काळची प्रेग्नंसी असेल तरी मूल लेफ्टी होऊ शकते. 

 

- जुळ्यांमध्ये जास्त प्रमाण?
बेल्जियमच्या एका संशोधनानुसार सामान्य लोकांच्या तुलनेत लेफ्ट हँडर्सचे प्रमाण जुळ्यांमध्ये अधिक असते. 


- लेफ्टी व्यक्तींना मेंदूची समस्या असते?
येल युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार लेफ्ट हँडेड लोकांना सिझोफ्रिनिया, सायकॉटिक डिसऑर्डर असे आजार असण्याची शक्यता अधिक असते. 

 

बातम्या आणखी आहेत...