आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 12 : 37 वर्षे मोठ्या अनूप जलोटासोबत रिलेशनशिपमध्ये होती जसलीन मथारू, तर दीपक ठाकुरवर एका कन्टेस्टंटने फेकली होती चप्पल, बिग बॉसचे 5 इंटरेस्टिंग किस्से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बिग बॉस 12 चा फिनाले झाला आहे. यावेळी बिग बॉसची ट्रॉफी दीपिका कक्करला मिळाली आहे. सडे तीन महिने चाललेल्या बिग बॉसमध्ये अनेक इंटरेस्टिंग किस्सेही ऐकायला मिळाले. जसे जसलीन मथारू आणि अनूप जलोटा यांचे फेक रिलेशनशिप तर दीपक ठाकुर - मेघा धाडे यांच्यातील भांडण. यासारखेच अजूनही काही किस्से आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच काही किस्से सांगणार आहोत. 

 

1. बिग बॉसच्या घरात जसलीन मथारूने 37 चर्ष मोठे भजन सिंगर अनूप जलोटा यांच्यासोबत एंट्री घेतली होती. दोघांनीही सांगितले होते की, ते रिलेशनशिपमध्ये आहेत. घरात दोघांमध्ये रोमांसही पाहायला मिळाला. जसलीन, अनूप जलोटांना किस करतानाही दिसली. पण ही रिलेशनशिप फेक होती. जसे दोघेही घराबाहेर पडले त्यांनी आपली रिलेशनशिप फेक असल्याचे सांगितले. पण दोन महिने यांची ही विचित्र जोडी खूप चर्चेत होती. 

 

2. दीपक ठाकुरचे सोमी खानविषयीये वेड चर्चेचा विषय होते. मात्र, दीपकच फक्त तिच्यासाठी वेड होता. तिने त्याला केवळ आपला चांगला मित्र मानले होते. 

 

3. या सीजनमध्ये हॅप्पी क्लब-वुल्फ क्लब सर्वात जास्त चर्चेत राहिले. हॅप्पी क्लबमध्ये कॉमनर्स होते, तर वुल्फ क्लबमध्ये सेलेब्स होते. दोन्ही क्लबमधील मेम्बर्समध्ये खूप तक्रारी व्हायच्या. 

 

4. प्रत्येक सीजनसारखे यावेळीही घरातील कन्टेस्टंटमधे भांडणे झाली. मात्र यावेळी सर्वात जास्त भांडणे दीपक ठाकुर आणि मेघा धाडेमध्ये झाले. रिपोर्टिंग टास्कमध्ये दीपकच्या भडकावण्यामुळे मेघाने त्यांच्या अंगावर थुंकले आणि सँडलसुद्धा फेकून मारली होती. 

 

भाऊ-बहिणीची जोडी.. 

5. बिग बॉसच्या घरात नेहमी रोमांटिक जोड्या बनतात. या कन्टेस्टंटमध्ये रोमांसही पाहायला मिळतो. पण यावेळी मात्र एक भाऊ आणि बहिणीची जोडी इथे बनली. दीपिका कक्कर आणि श्रीसंत या दोघांमध्ये भाऊ बहिणीचे नाते बनले आणि तो चर्चेचा विषय ठरला. दोघांनी हे नाते घरात चांगले निभावलेही. 

 

बातम्या आणखी आहेत...