आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिऊन दंगा घालणाऱ्या टवाळखोरांना रोखणे क्रिकेटरला पडले महाग, कपडे फाडत केली मारहाण; हाताची नस कापून झाले फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गाझियाबाद -  येथे टवाळखोरांनी एक युवा क्रिकेटरला मारहाण केल्याची घटना घडली. दारू पिऊन धिंगाणा घालण्यास विरोध केल्याच्या कारणावरून टवाळखोरांनी या क्रिकेटरला मारहाण करून त्याचे कपडे फाडेल. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी क्रिकेटच्या हाताची नस कापली. क्रिकेटर प्रशांत तिवारीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

होळीच्या दिवशी ते आपल्या मित्रासोबत बिल्डिंगखाली उभे होते. दरम्यान तेथे काही लोक दारू पिऊन हुडदूस घालत होते. त्याने गोंधळ घालण्यावरून  टोकले असता त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवत मारहाण केली. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी दारूची बाटली फोडून प्रशांतच्या हाताची नस कापली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा नोंद केला असून तपास सुरु केला आहे. 

 

आयपीएलमध्ये होणार होते सिलेक्शन पण आता करिअर बर्बाद होण्याची भीती

प्रशांतने पोलिसांना सांगितले की, तो मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळतो. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियंस संघात त्याची जागा नक्की होणार होती. पण या घटनेमुळे करिअर खराब होणार असल्याची भीती आहे. 

बातम्या आणखी आहेत...