आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीची आवड, वडिलांच्या आदेशावरून राजकारणात झाले सक्रीय, येथे पाहा उद्धव यांचे काही खास फोटोज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.   27 जुलै 1960 रोजी मुंबईत जन्मलेले उद्धव जेजे स्कूलमधून पदवीधर आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, दोन मुले आदित्य आणि तेजस असा त्यांचा परिवार आहे. उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीत रस असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. परंतु वडिलांच्या आदेशावरून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि सक्रिय झाले. बाळासाहेबांनी सर्वात अगोदर 2002 मध्ये उद्धव यांच्याकडे बीएमसी निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. उद्धव ठाकरेंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली.   बाळासाहेबांनी 2003 मध्ये उद्धव यांचा राजकारणातला सहभाग वाढवण्यासाठी त्यांना शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले होते. यानंतर बाळासाहेबांनी 2004 मध्ये त्यांना पक्षाचा पुढील अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली होती. राज्यात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेतही त्यांनी शिवसेनेचा पाया रचला. सामनातील लेखाद्वारे त्यांनी आपली आक्रमक प्रतिमा निर्माण केली.उद्धव ठाकरे कोणतीही निवडणूक न लढवता मुख्यमंत्री होणारे राज्याचे पहिले नेते ठरतील. - Divya Marathi
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 27 जुलै 1960 रोजी मुंबईत जन्मलेले उद्धव जेजे स्कूलमधून पदवीधर आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, दोन मुले आदित्य आणि तेजस असा त्यांचा परिवार आहे. उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीत रस असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. परंतु वडिलांच्या आदेशावरून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि सक्रिय झाले. बाळासाहेबांनी सर्वात अगोदर 2002 मध्ये उद्धव यांच्याकडे बीएमसी निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. उद्धव ठाकरेंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली. बाळासाहेबांनी 2003 मध्ये उद्धव यांचा राजकारणातला सहभाग वाढवण्यासाठी त्यांना शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले होते. यानंतर बाळासाहेबांनी 2004 मध्ये त्यांना पक्षाचा पुढील अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली होती. राज्यात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेतही त्यांनी शिवसेनेचा पाया रचला. सामनातील लेखाद्वारे त्यांनी आपली आक्रमक प्रतिमा निर्माण केली.उद्धव ठाकरे कोणतीही निवडणूक न लढवता मुख्यमंत्री होणारे राज्याचे पहिले नेते ठरतील.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे कोणतीही निवडणूक न लढवता मुख्यमंत्री होणारे राज्याचे पहिले नेते ठरतील.

27 जुलै 1960 रोजी मुंबईत जन्मलेले उद्धव जेजे स्कूलमधून पदवीधर आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, दोन मुले आदित्य आणि तेजस असा त्यांचा परिवार आहे. उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीत रस असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. परंतु वडिलांच्या आदेशावरून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि सक्रिय झाले. बाळासाहेबांनी सर्वात अगोदर 2002 मध्ये उद्धव यांच्याकडे बीएमसी निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. उद्धव ठाकरेंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली.

बाळासाहेबांनी 2003 मध्ये उद्धव यांचा राजकारणातला सहभाग वाढवण्यासाठी त्यांना शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले होते. यानंतर बाळासाहेबांनी 2004 मध्ये त्यांना पक्षाचा पुढील अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली होती. राज्यात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेतही त्यांनी शिवसेनेचा पाया रचला. सामनातील लेखाद्वारे त्यांनी आपली आक्रमक प्रतिमा निर्माण केली.