आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसायनविरहित फळे ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजच्या आहारात एक तरी फळ नक्कीच असले पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे, पण निरोगी आरोग्यासाठी चांगल्या फळांची ओळख आणि निवडही तितकीच आवश्यक असते. त्यामुळे केमिकल फ्री आणि चांगली फळे ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स येथे सांगत आहाेत. फळे सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी आजकाल अपायकारक विषारी पदार्थांचा वापर केला जातो. बाहेरून ही फळे जरी दिसायला सुंदर असली तरी आरोग्यासाठी नुकसानदायक सिद्ध होत आहेत. फूड पॉयझनिंग ते कॅन्सर अशा अनेक आजारांमागील कारण ही केमिकलचा वापर करून पिकवलेली फळे कारणीभूत ठरत आहेत.

केमिकलच्या वापराने अशी पिकवली जातात

फळांची चव गोड लागावी आणि ती लवकर पिकावी म्हणून इथेनॉल-39, काबाइड आणि अॅथलिन गॅसचा वापर केला जातो. काबाइडचा वापर फळांना लवकर पिकवण्यासाठी त्यांच्यावर शिंपडून केला जातो, तर इथेनॉल पाण्यात विरघळवून त्यात फळ बुडवून ठेवली जातात. ज्यामुळे ती जास्त वेळासाठी ताजी दिसतात.

सफरचंद : सकाळी उठल्यावर सफरचंद खाण्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते. त्यामुळे सफरचंद घेताना ते नेहमी कडक आहे की नाही हे पाहून घ्या. तसेच त्याचा रंग गडद असावा. खराब सफरचंद हे नेहमी कोरडे आणि फिकट रंगाचे असते. तसेच ते थोडे नखाने कोरूनही पाहा. कारण आजकाल बरेचदा सफरचंद चमकदार दिसण्यासाठी त्यावर मेणही लावले जाते.

केळी : केळी फिलिंग फ्रूट आहे. जे सकाळी खाणे चांगले असते आणि त्यामुळे भूकही कमी लागते. पिकलेली केळीही नेहमी पिवळ्या रंगाची असतात, पण पिकलेल्या केळ्याचे देठही तसेच असावे हे नक्की पाहा. कारण कृत्रिमरीत्या पिकवलेल्या केळ्याचे देठ हे हिरव्या रंगाचे असते.

मोसंबी : मोसंबीचा ज्यूस प्यायचा सल्ला नेहमीच दिला जातो. कारण हा ज्यूस पिणे फायदेशीर असते. रसदार पिवळी मोसंबी ही वजनाला भारी असते. डाग पडलेली मोसंबी कधीच घेऊ नका.

पपई : पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. त्यामुळे पपई घेताना ती नीट पारखून घेणेही आवश्यक आहे. हलक्या हिरव्या आणि पिवळ्या रंगाची पपई ही चवीला गोड असते. दाबताच दबणारी पपई घेऊ नका. जर पपईवर पांढरे डाग असतील तर ती आतून खराब असू शकते.

संत्री : उन्हाळा असो वा हिवाळा संत्र्याला नेहमीच पसंती असते. कारण डाएट किंवा आजारी माणसालाही संत्री खूपच गुणकारी आहे. गडद रंगाची संत्री गोड आणि रसाळ असतात. चांगले संत्री हे थोडे चमकदार आणि साल थोडे कडक असते. खराब संत्री नेहमी बाहेरून सुकलेले आणि जाड सालीचे असते. अशी संत्री खरेदी करू नका. कारण ती कडू असू शकतात.

बातम्या आणखी आहेत...