आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त 'सेवा ग्राम' येथील काही खास फोटोज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेवाग्राम येथील आणखी फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा... - Divya Marathi
सेवाग्राम येथील आणखी फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

वर्धा - आज महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी 23 सप्टेंबर 1933 मध्ये जमनालाल बजाज यांच्या आग्रहास्तव वर्ध्यात आले होते. हरिजन सेवेचे व्रत घेतलेल्या मीराबेन यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनीही ‘खेड्याकडे चला’चा नारा देत 13 एप्रिल 1936 ला सेवाग्राम गाठले.

सेवाग्रामस्थित बजाज यांच्याच शेतात कुटी बनवण्यात आली. ही कुटी बापूंचे केवळ निवासस्थान राहिले नाही तर विचार परिवर्तनाचे केंद्र बनले. 1936 ते 1946 पर्यंत बापूंनी सेवाग्रामात वास्तव्य केले. आज संगणकीय युगातही गांधी विचारांच्या अनुसरणासाठी सेवाग्राम आश्रमाला देशासह विदेशातील पर्यटक भेट देऊन गांधीविचारांचा वारसा पुढे चालवत आहेत.