आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दातांची काळजी घेण्याच्या काही टिप्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दात घासण्यासाठी कुठल्या पदार्थांचा वापर केल्यास दातांना मजबुती मिळेल आणि मौखिक आरोग्य सुदृढ राहील याविषयी आयुर्वेदाने तपशिलात मार्गदर्शन केले आहे. - दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी आयुर्वेदात बारकाईने मार्गदर्शन करण्यात आले अाहे. दातांचे आरोग्य राखल्यास संपूर्ण शरीराचे आरोग्य राखण्यास मदत होते. दररोज दात घासणे हे शरीर स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. यामुळे अनेक रोगांना लांब ठेवण्यास मदत होते. झोपल्यावर लाळेमधून स्रवणारे घटक तसेच श्वासोच्छ्वासाने हवेमधले घटकही दातांच्या सभोवताली साठतात. निरोगी आरोग्यासाठी हे घटक काढून टाकणे निकडीचे आहे. - दातांचा आणि पचनाचा घनिष्ठ संबंध आहे. नीटपणे चावलेल्या अन्नाचे पचन सुलभपणे होते. अन्न नीट चावता येण्यासाठी दातांचे मुळे घट्ट असणे गरजेचे आहे. त्यासाठी दातांना मजबूत करणाऱ्या पदार्थांचा वापर करून दात घासणे फायद्याचे ठरते. दात घासल्यावर तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेमुळे पचनाची क्रिया सुरळीत पार पडते. त्यामुळे दातांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. - दातांच्या आरोग्यावर आहार, दिनचर्या आणि व्यसन यांचा परिणाम होतो. दातांची योग्य निगा न राखल्यास अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे दातांचे आरोग्य बिघडू नये याची काळजी घेणे गरजेेचे आहे.

  • दात खराब का होतात?

- एकाच वेळी थंड आणि गरम पदार्थांचे सेवन केल्याने दात ढिले होतात. - तंबाखू, पान, सिगरेट या व्यसनांमुळे दातांवर किटण साचते. - दात कोरण्याच्या सवयीमुळे हिरड्यांमध्ये जखम होते. - जोरात घासल्याने हिरड्या सोलवटतात

  • दात घासण्यासाठी याचा वापर करा

- त्रिफळा चूर्णात दोन थेंब तिळाचे तेल घातलेले मिश्रण - तिळाची पूड, ज्येष्ठमधाची पूड आणि तिळाचे तेल एकत्र करून बनवलेली पेस्ट - बकुळ, बाभूळ, करंज, वड, लिंब, आणि त्रिफळा यांचे बनवलेले चूर्ण वापरा.

बातम्या आणखी आहेत...