आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युपी हायवेवरील निर्माणाधीन उड्डाण पूल कोसळला, 4 मजूर जखमी काही अडकले असल्याची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल हायवे क्रमांक 28 वरील उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग. - Divya Marathi
नॅशनल हायवे क्रमांक 28 वरील उड्डाणपुलाचा कोसळलेला भाग.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील नॅशनल हायवे क्रमांक 28 वरील बांधकाम सुरू असलेला उड्डाणपुलाचा काही भाग पहाटे कोसळला. यामध्ये काम करणारे चार मजूर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  


अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पुलाला आधारे देणारे खांब जमीनीमध्ये खाली दबले गेल्यामुळे हा अपघात घडला. या परिसरात गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस होत आहे, त्यामुळे जमिनीखाली ओलाव्यामुळे हे खांब जमिनीत दबले गेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्याच आठवड्यात स्थानिक अधिकाऱ्यांनी या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली होती, असेही स्थानिकांनी सांगितले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...