ठेवू नका हे / ठेवू नका हे पासवर्ड, नाहितर तुमचे अकाउंट होईल हॅक...

 

जगभरातील 100 सगळ्यात खराब पासवर्डची लिस्ट जाहीर. 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 17,2018 02:04:00 AM IST

नवी दिल्ली- आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात कोणत्याही गोष्टीसाठी पासवर्ड मह्त्तावचा आहे. त्यसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पासवर्डचा वापर करतात. पण आजही अनेक लोक पासवर्ड ठेवण्यात हलगर्जीपणा करतात, आणि नंतर त्याचे परिणाम भोगतात. जगभरात अनेक ठिकाणी डाटा चोरी केल्याचे प्रकरण समोर आली आहेत. यात गूगल प्लस डाउन आणि फेसबुक डाटा चोरी मुख्य आहेत. इतक्या मोठ्या घटना होऊनदेखील लोक साधारण पासवर्ड ठेवतात.

हे आहेत जगातील सगळ्यात खराब पासवर्ड
पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅस आयडीने साल 2018 चे 100 सगळ्यात खराब पासवर्डची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये 123456 पासवर्ड सगळ्यात टॉपवर आहे. स्प्लॅस आयडीने ही लिस्ट या वर्षात लीक झालेल्या 50 लाख पासवर्डचे परीक्षण केल्यानंतर जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये दूसऱ्या नंबरवर तो पासवर्ड आहे ज्याला लोक सगळ्यात सुरक्षित मानतात आणि तो पासवर्ड आहे "password". सगळ्या खराब पासवर्डच्या लिस्टमध्ये तीसऱ्या नंबरवर 123456789 हा पासवर्ड आहे.


टॉप 25 मध्ये आहे Donald
या 100 सगळ्यात खराब पासवर्डच्या लिस्टमध्ये अनेक कॉमन नाव देखील आहेत. यात admin आणि qwerty सारखे पासवर्डदेखील आहेत. यात खास बाब म्हणजे अनेक लोकांनी यात Donald हा पासवर्ड वापरला आहे. या पासवर्डला या लिस्टमध्ये 23 वे स्थान मिळाले आहे. त्याशिवाय लोकांनी princess, sunshine, [email protected]#$%^&* सारख्या पासवर्डचाही वापर केला आहे.


पासवर्ड ठेवताना सावधगीरी बाळगा
सगळ्यात खराब पासवर्डबद्दल ऐकल्यानंतर तुम्हाला कळाले असेल की, कसा पासवर्ड ठेवायचा आहे. पासवर्ड ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्सही देणार आहोत. तुम्ही पासवर्ड ठेवताना अपरकेस, लोवरकेस, स्पेशल कॅरेक्टर्स आणि नंबरचे कॉम्बिनेशन ठेवा. अशाप्रकारच्या पासवर्डना हॅक करणे अवघड असते.

हे आहेत 2018 चे सगळ्यात खराब पासवर्ड

- 123456
- password
- 123456789
- 12345678
- 12345
- 111111
- 1234567
- sunshine
- qwerty
- iloveyou

X
COMMENT