आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी घेतोय संधीचा फायदा, तर कुणी अनुभव घेण्यासाठी जात आहेत 'बिग बॉस'च्या घरात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'बिग बॉस 13' या रिअॅलिटी शोचा प्रवास सुरू झाला. या कार्यक्रमात अनेक नामांकित टीव्ही चेहरे सहभागी होत आहेत. देवोलीना भट्टाचार्यपासून रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला ते दलजित कौरपर्यंत अनेक टीव्ही सेलेब्ज शोचे विजेतेपद जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. 'बिग बॉस'च्या घरात जाण्यापूर्वी या स्पर्धकांशी झालेला संवाद...

वैयक्तिक जीवनाविषायी जास्त बाेलणार नाही : रश्मी देसाई
गेल्या अनेक वर्षांपासून मला या शोसाठी ऑफर येत आहेत, पण तरीही मी त्यात सहभागी होत नव्हते. यामागील बरीच कारणे होती, माझ्याकडे दुसरे कार्यक्रम होते, शिवाय वैयक्तिक कारणामुळेदेखील मी वेळ देऊ शकत नव्हते. यावेळी असे काहीही नव्हते आणि म्हणूनच मी हो म्हणाले. मी अरहान खानला डेट करत असल्याची चर्चा पसरली आहे. मात्र यात काही तथ्य नाही. तो फक्त माझा चांगला मित्र आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी मी शोमध्ये काहीच बोलणार नाही. फक्त चांगले खेळण्याचा प्रयत्न करेन.

शालीनचे चॅप्टर माझ्या आयुष्यातून निघाले : दलजित कौर
मी एका दिवसांपेक्षा जास्त काळ माझ्या मुलापासून दूर राहत नाही. मात्र आता तीन महिने त्याच्यापासून मला दूर राहउयचे आहे. याचाच मी विचार करत आहे, हे माझ्यासाठी सर्वात कठीण काम आहे. शालीनचा विषय माझ्या आयुष्यातून संपला आहे. घरात त्याचा उल्लेखही कोणी करत नाही.

करिअर सुधारण्यासाठी नाही चालले : कोयना मित्रा
मी या शोबद्दल खूप उत्साही आहे. माझे करिअर सुधारण्यासाठी मी शोमध्ये जात असल्याची बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे, पण असे नाही. मी खूप यशस्वी मॉडेल आहे. मी प्रत्येक वेळी माझा प्रकल्प अतिशय विचारपूर्वक निवडला आहे. माझ्याकडे काम नाही, असे कधी झाले नाही. मी या शोची एक मोठी चाहती आहे आणि जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी नक्कीच करणार.

गेल्या वर्षी झालेल्या वादात क्लीन चिट मिळाली होती : देवोलीना
मी माझ्या गोपी बहुची प्रतिमा सुधारण्यासाठी या घरात जात आहे, बसे बरेच लोक विचार करत आहेत.
परंतु तसे नाही. माझ्या प्रतिमेसाठी मी बरेच फोटोशूटही केले आहे.. 'बिग बॉस' ही एक चांगली ऑफर आहे. ती करायला हवी, त्यामुळे मी चालले एवढेच.

प्रेक्षकांच्या प्रतिसादाची भीती वाटतेय : आरती सिंह
'बिग बॉस' एक व्यासपीठ आहे, फक्त माझे करिअर सुधारण्यासाठी मी तेथे चालले नाही.तो एक चांगला शो आहे. या शोमध्ये कलाकार प्रेक्षकांसोबत आपले विचार मांडतो. त्यांना तो कसा आहे हे कळते. त्याचा स्वभाव कळतो.
त्यामुळे प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, याची भीती वाटत आहे. मी कुणाची भाची एखाद्याची बहिण म्हणून चालले नाही तर स्वत:साठी चालले आहे.