आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इंडियन आयडल' च्या एक्स कन्टेस्टंटला लाखो रुपयांचा चुना लावून गेली एक व्यक्ती, एक्सिक्युटीव्ह बनून आधी मिळवल्या बँक डिटेल्स आणि मग रिकामे केले अकाउंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पॉप्युलर सिंगिंग रियलिटी शो 'इंडियन आइडल' सीजन-10 ची एक्स कन्टेस्टंटला एका इसमाने लाखोंचा चूना लावला. कन्टेस्टंटला फसवणार हा इसम झारखंडच राहणार आहे आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने इंडियन आयडलच्या एक्स कन्टेस्टंटचे 1 लाख 75 हजार रुपये लुटले आहेत.  

असे आहे पूर्ण प्रकरण...
इंडियन आयडलची कन्टेस्टंट असलेली 23 वर्षांची अवंती पटेलला झारखंडच्या राजकुमार जयनारायण मंडल याने 31 डिसेंबर 2018 ला फोन केला होता. फोन कॉलदरम्यान त्याने बँक एक्सिक्युटीव्ह असल्याचे सांगत अवंतीकडून तिच्या बँक डिटेल्स आणि डेबिट कार्डचा पासवर्ड विचारला. त्यानंतर त्याने अवंतीच्या अकाउंटमधून दोन-तीन वेळा एकूण 1 लाख 75 हजार रुपये काढले. अवंतीला या सर्वांबद्दल तेव्हा कळले जेव्हा तिने तिचे अकाउंट चेक केले. त्यानंतर अवंतीने मुंबईच्या सायन पोलीस स्टेशनमध्ये फासळवणूक केल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा फोन ट्रॅक केला आणि फोनची लोकेशन झारखंडमध्ये ट्रेस झाली. त्यांनतर पोलिसांची टीम झारखंडमध्ये पोहोचली आणि देवघर सायबर सेलच्या मदतीने आरोपीला अटक गेले गेले. आरोपीकडे 15 मोबाइल, 4 पासबुक आणि डेबिट कार्ड मिळाले आहेत. आरोपीचे नाव आधीपासूनच आणखी दोन फसवणुकीच्या केसमध्ये आहे. 

बातम्या आणखी आहेत...