आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 12 मध्ये नवऱ्याला हरवणाऱ्या दीपिका कक्करच्या सपोर्टसाठी पुढे आली श्रीसंतची पत्नी, अभिनेत्रीला अॅसिड अटॅकची धमकी देणाऱ्याबद्दल जे तिने लिहिले ते मन जिंकणारे आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 30 डिसेंबरला 'बिग बॉस 12' चा फिनाले झाला आणि दीपिका कक्करला विनर घोषित केले गेले. पण ती विजेता बनताच वाद सुरु झाले. 'बिग बॉस 11' ची विनर आणि 'भाबीजी घर पर हैं' मध्ये अंगूरी भाभीचा रोल केलेली शिल्पा शिंदेने दीपिकाची तुलना माशीसोबत केली. आता दीपिका आणि तिचपती शोएब इब्राहिमने शिल्पाच्या कमेंटवर रिएक्शन दिले आहे. दीपिका म्हणाली, "मला माहित नाही की ती माझ्याबद्दल असे काही का बोलत आहे आणि आणि आता का करत आहे. कदाचित तिला माझी जर्नी (अभिनेत्री म्हणून) आवडली नसेल, यामुळेच जास्त रिएक्ट करत असेल".  

 

दीपिकाने शिल्पाला दिला मॅसेज...
- दीपिकाने एका इंटरव्यूदरम्यान सांगितले, "मी तिला फक्त एवढेच सांगू इच्छिते की, तिला जे म्हणायचे आहे ते, म्हणत राहा. पण मला स्वतः वर पूर्ण विश्वास आहे स्वतःवर, नवऱ्यावर, सासूवर आणि माझ्या फॅन्सवर . आम्ही कुणाचीही कधी उगीच चेष्टा करत नाही. आम्ही चांगले लोक आहोत आणि नेहमी चांगलेच वागू". दीपिकाच्या हो मध्ये हो मिसळत पती शोएब इब्राहिम म्हणाला, "आम्ही ते नाही, जे स्वतः उंच वाढण्यासाठी कुणाला खाली पाडू. आम्ही अशा लोकांना इग्नोर करतो आणि हेच करत राहू"

 

काय होते दीपिकासाठी शिल्पाचे स्टेटमेंट... 
- दीपिका विनर बनल्यानंतर शिल्पाने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "आजकल सगळेच प्रोडक्ट बनावटी आहेत. एवढेच काय तर माशी मारण्याचेही. शोचे मेकर्सनेही बनावटी प्रोडक्टला प्रमोट सुरु केले आहे. माशी ('ससुराल सिमर का' मध्ये काही काळासाठी दीपिकाने माशीचाही रोल निभावला होता) पूर्ण सीजन गुणगुण करत राहिली. आणि शेवटी जिंकलीही. यामुळे ट्रॉफीसुद्धा ब्रेक झाली" 

 

असिड अटॅक कॉन्ट्रोवर्सीवर बोलली श्रीसंतची पत्नी...

- दीपिका कक्करच्या एका फॅनने ट्वीट करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती की, श्रीसंतचा एक फॅन दीपिकालं अॅसिड अटॅकची धमकी देत आहे. आता श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने ट्विटरवर लिहिले आहे की, अशी धमकी देणारा श्रीसंतचा फॅन असूच शकत नाही. भुवनेश्वरीने लिहिले, "माझ्या प्रिय श्रीसंतच्या  चाहत्यांनो, काल मला असिड अटॅकच्या बातमीबद्दल माहिती झाले. आम्ही सांगू इच्छितो की, मला आणि श्रीसंतला पूर्ण विश्वास आहे की, त्याचे फॅन्स असे काहीही लिहू शकत नाही. हे कुणी दुसरेच असेल, जे स्वतःला श्रीसंतिचा फॅन म्हणवत आहे" भुवनेश्वरीने दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, "आमच्यासाठी खूपच असभ्य आणि वाईट ट्वीट्सचा वापर केला गेला होता. मला माहित आहे की, लोकांच्या लिहिण्यावर आपला कंट्रोल नाही. काही ऑनलाइन रिव्यूर्स याची संधी साधतात. कारण आम्ही त्यांना इंटरव्यू द्यायला नकार दिला. मी श्रीसंतच्या फॅन्सला ओळखते आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे की, ते नेहमी स्ट्रॉन्ग राहतील". 

Ther had been a lot of abusive nd worst tweets for us as well frm other fandoms. I knw we have no control over what some ppl write.Some online reviewers pick it up solely because We refuse to give interview on their channel. I knw my Sreefam nd our trust for you remains strong.🤗

— Bhuvneshwari Sreesanth (@Bhuvneshwarisr1) January 7, 2019

 

काय होते हे पूर्ण प्रकरण... 
- श्रीसंथ द रियल फॅन या नावाने हे ट्विट दीपिकासाठी लिहिले गेले होते. "किती घतीया बाई आहे ही. ए माशी तू एकदा लाइव ये, डायवोर्सी बाई, आम्ही तुला किती ट्रोल करू. अजून तुझ्या पर्सनल लाइफवरही आम्ही अटॅक करू. बघ तू. जर तू मुंबईत दिसलीस तर तुझयावर अॅसिड फेकेन." दीपिका विनर झाल्यानंतर मागच्या पाच सहा दिवसांपासून श्रीसंतचे फॅन्स राग काढत आहेत. दीपिकाविरुद्ध हॅशटॅग चालवले जात आहेत. पण अॅसिड अटॅकच्या धमकीनंतर हे प्रकरण क्राइमकडे वळले आहे. याविरुद्ध दीपिकाचे फॅन्सने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फॅनने ट्विटरवर लिहिले मुंबई पोलिसानं मेन्शन करून, "डियर मुंबई पोलीस हा मुलगा एक महिलेला अॅसिड अटॅकची धमकी देत आहे. जेवढे लवकर होईल, प्लीज याला अरेस्ट करा". 

Dear @MumbaiPolice this guy is threatening to throw acid on lady...Please arrest him early as possible

Please RT and Spread so this post can reach to @MumbaiPolice@CNNnews18 @RVCJ_FB @ZeeNews @aajtak @abpnewshindi @indiaforums @Spotboye @TheKhbri pic.twitter.com/fLvkhoRoSr

— Dipika Kakar™💫BB12 Winner🏆 (@DipikaKakar_TM) January 4, 2019

 

बातम्या आणखी आहेत...