आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक वर्षांपासून बंद मीठाच्या खाणीत पोहोचले संशोधक, दिसले असे काही की सगळेच झाले आवाक्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलंड - पोलंडच्या क्राको शहरापासून दूर एक गूढ मीठाची खाण आहे. अनेक वर्षांपूर्वी तयार झालेली मीठाची खाण आज जगभरातील लोकांसाठी टुरिस्ट स्पॉट बनली आहे. दशकांपासून क्राको शहरातील लोक याला खाण समजत होते. खाण बंद झाल्यावर त्यामध्ये काही संशोधक पोहोचले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या खाणीच्या 400 फूट खाली एक आलिशान महाल होता. 
  

कोठून आला हा महाल..? 

> ही खाण 15 व्या शतकातील असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. त्याकाळात मीठाला मौल्यवान समजले जात होते. त्यामुळे अशा खाणी राजा-महाराजा सांभाळत असत.

> येथे काम करणारे मजूर दिवसभरातील जास्त काळ याच खाणीमध्ये घालवत होते. यातील काहींनी रिकाम्या वेळेत मीठाच्या ढिगाऱ्यांवर नक्षीकाम करणे सुरू केले होते.  

> बघता-बघता मीठाच्या या ढिगाऱ्यांना मूर्तींचे रूप देण्यात आले. त्यानंतर खाणी बंद पडलेल्या खालच्या भागाला राजवाड्यासारखे सजवले.


यामुळे मूर्ती बनवत होते मजूर
> असे सांगितले जाते की, खाणीतील कामगारांनी तेथे राजाच्या मूर्ती तयार केल्या आहेत. सगळ्या मजुरांच्या मनात राजाविषयी आदरभाव होता आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांनी या मूर्तींची रचना केली. अशीच एक प्रचलित गोष्ट आहे की, एकदा महाराणी किंगा यांनी येथे येऊन मजुरांना खोदकाम करण्यास सांगितले. त्यांना खोदकाम करण्यास सांगितलेल्या ठिकाणी एक मौल्यवान अंगठी सापडली होती. त्यानंतर या खाण कामगारांनी राणीच्याही सन्मानार्थ अनेक मूर्तींची निर्मिती केली.  


443 फूट खाली आहे राजदरबार
> खाणीच्या खाली तयार करण्यात आलेल्या महालाचे अद्भुत फोटो जगासमोर आले आहेत. अंदाजे 443 फूट खाली म्हणजेच 9 मजले उंच इमारती इतक्या खाली खोल तयार करण्यात आलेल्या राजेशाही खोल्या आणि तेथे केलेले नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. लोकांना येथे आल्यावर विश्वास बसत नाही की, ते जमिनीच्या 400 फूट खाली आहेत. 


आतमध्ये तयार करण्यात आले आलिशान चर्च
> या खाणीमध्ये वेगवेगळ्या खोल्यांत कामगारांनी ही कलाकारी केली आहे. अंदाजे 330 फूट खोल एक आलिशान चर्च तयार करण्यात आलेले आहे. हे चर्च जगातील सर्वात मोठे अंडरग्राउंड चर्च आहे. 


आत आहेत 2 हजार खोल्या
> शेकडो वर्षांपूर्वीच्या या खाणीमध्ये असलेल्या खोल्या फिरण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. कारण येथे खाली तब्बल 2 हजार खोल्या तयार केलेल्या आहेत, असे सांगितले जाते. 


टूरिस्ट आणि पार्टीसाठी खुली केली खाण
> 2007 नंतर या खाणीचे जतन करण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर याला लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. जगभरातील टूरिस्ट येथे फिरण्यासाठी येत असतात. तसेच ही खाण पार्टी आणि वेडिंग डेस्टिनेशनही झाले आहे. 

 

या खाणीचे अप्रतिम फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.......

 

बातम्या आणखी आहेत...