आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमनाथदांनी ४० वर्षे राजकारण केले, १० वेळा खासदार, लोकसभेत ५०० पेक्षा जास्त भाषणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९२९ : आसाममध्ये झाला जन्म, राजकारणासाठी प. बंगालची निवड  

सोमनाथ चटर्जी यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी निर्मलचंद्र चटर्जी व वीणापाणी देवी यांच्यापोटी आसामच्या तेजपूरमध्ये झाला. त्यांचे शिक्षण कोलकाता व ब्रिटनमध्ये झाले. सोमनाथदांचे वडील हिंदू महासभेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. साेमनाथदांना एक पुत्र व दोन मुली आहेत.


१९६८ : फक्त एकदा पराभव; ममता बॅनर्जींकडून हरले  
सोमनाथदांनी १९६८ मध्ये सीपीएममध्ये प्रवेश केला. १९७१ मध्ये प्रथम बंगालमधून अपक्ष खासदार झाले. त्यांना सीपीएमचा पाठिंबा होता. ४० वर्षांपर्यंत सीपीएमचे सदस्य राहिले. ते १० वेळा खासदार होते. केवळ १९८४ मध्ये जाधवपूर मतदारसंघातून एकदाच ममता बॅनर्जींकडून हरले.  


१९९६ : सर्वाेत्कृष्ट खासदाराचा पुरस्कार, लोकसभा वाहिनी सुरू
सोमनाथदांना १९९६ मध्ये सर्वाेत्कृष्ट खासदाराचा पुरस्कार मिळाला. २००४ मध्ये यूपीए-१ सरकारमध्ये ते लोकसभा अध्यक्ष होते. ते कम्युनिस्ट पक्षाकडून अध्यक्ष होणारे पहिले खासदार होते. त्यांनी प्रथमच २४ तासांची लोकसभा वाहिनी सुरू केली. पहिल्यांदाच शून्य प्रहराचे थेट प्रक्षेपणही सुरू केले. 


२००८ : पक्षाकडून हकालपट्टी, वर्षभरानंतर राजकीय संन्यास  
२००८ मध्ये यूपीए सरकारने अमेरिकेशी अणुकरार केला. सीपीएमने त्यास विरोध केला. पक्षाने सोमनाथदांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. सीपीएमने त्यांची हकालपट्टी केली. २००९ मध्ये सोमनाथदांनी राजकीय संन्यास घेतला.

बातम्या आणखी आहेत...