Home | Jeevan Mantra | Dharm | somnath jyotirlinga story in marathi

सासऱ्याच्या शापातून मुक्तीसाठी चंद्रदेवाने केली होतील सृष्टीवरील या पहिल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 10:40 AM IST

संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे

 • somnath jyotirlinga story in marathi

  संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते.


  शिवपुराणानुसार, प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते. त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट इतर पत्नींना आवडली नाही. ही गोष्ट त्यांनी वडील दक्ष यांना सांगितली, त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले, परंतु चंद्रदेव तयार झाले नाहीत. तेव्हा क्रोधीत होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षय रोग होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिव भक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले.


  सोमनाथ मंदिराच्या भिंतीवरील मूर्तिकाम मंदिराची भव्यता दर्शवते. स्कंद पुराणातील प्रभासखंडमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते. या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील तेव्हा सोमनाथचे नाव 'प्राणनाथ' असेल. प्रलयानंतर नवीन सृष्टीमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग प्राणनाथ नावाने ओळखले जाईल.


  मंदिराच्या भिंतीवर महादेवासोबतच ब्रह्मा, विष्णू यांच्या मूर्ती आहेत. स्कंद पुराणातील प्रभास खंडामध्ये पार्वतीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना महादेव सांगतात की, आतापर्यंत सोमनाथचे आठ नाव बदलेले आहेत.


  सोमनाथचे सेवक नंदी मंदिरात विराजमान होऊन महादेवाचे ध्यान करतात. स्कंद पुराणात सांगण्यात आले आहे की, सृष्टीमध्ये आतापर्यंत सहा ब्रह्मा बदलले आहेत. हे सातवे ब्रह्मा युग असून यांचे नाव 'शतानंद' आहे. महादेव सांगतात की, या युगात माझे नाव सोमनाथ आहे. मागील युगात जे ब्रह्मा होते त्यांचे नाव 'विरंची' होते. त्या युगामध्ये या शिवलिंगाचे नाव मृत्युंजय होते.


  स्कंद पुराणात महादेव सांगतात की, दुसऱ्या युगात ब्रह्माजी पद्मभू नावाने ओळखले जात होते आणि त्या वेळी सोमनाथ ज्योतिर्लिंगचे नाव 'कालाग्निरुद्र' असे होते. तिसऱ्या ब्रह्मांची सृष्टी स्वयंभू नावाची होती आणि त्या वेळी सोमनाथचे नाव अमृतेश होते.


  सोमनाथ मंदिराविषयी महादेव सांगतात की, चौथ्या ब्रह्माचे नाव परमेष्टी झाले तेव्हा सोमनाथ 'अनामय' नावाने विख्यात होते. पाचवे ब्रह्मा सुरज्येष्ठ झाल्यानंतर या ज्योतिर्लिंगाचे नाव 'कृत्तिवास' होते. सहावे ब्रह्मा हेमगर्भ झाल्यानंतर यांच्या युगात सोमनाथ भैरवनाथ नावाने प्रसिद्ध झाले.


  पुराणानंतर पुढे जाणून घ्या, सोमनाथ मंदिरावाषयी इतिहासात दडलेल्या गूढ रहस्यांविषयी...

 • somnath jyotirlinga story in marathi

  हे आहे वर्तमान सोमनाथ मंदिराच्या पूर्व दिशेचे तुटलेले सोमनाथ मंदिर. हे मंदिर अनेकदा तोडण्यात आले असून पुन्हा बांधले आहे. असे मानले जाते की, वर्तमान सोमनाथ मंदिरापुर्वी हे मंदिर सहा वेळेस तोडले आणि बांधले गेले. वर्तमान मंदिराचे निर्माण भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार पटेल यांच्या प्रयत्नांनी झाले.

 • somnath jyotirlinga story in marathi

  सोमनाथ मंदिराविषयी अशीही मान्यता आहे की, चंद्रदेवाने या मंदिराचे निर्माण सोन्याने केले होते.

Trending