आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या सोमनाथने विजयपूरला गोलघुमटमध्ये उडी मारून केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - येथील एका तरुणाने विजयपूर (विजापूर) येथील गोलघुमटवरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विजयपूर येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तात या तरुणाचे नाव सोमनाथ तरनाळकर (वय २४) असे असल्याचे म्हटले आहे. या तरुणाचे नाव सोमनाथ असल्याचे विजयपूर येथील पोलिस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. सोमनाथ याने गोलघुमटच्या आतील भागात १०० फुटांवरून उडी घेतली. तो एकटाच तेथे गेला होता. 


सोमनाथ हा आत्महत्येसाठी उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील सुरक्षारक्षकाने सोमनाथला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला न जुमानता त्याने उडी मारली. सोमनाथच्या कुटुुंबीयांना पोलिसांनी माहिती दिली आहे. याबाबत गोलघुमट पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी घटना घडल्याचा दुजोरा दिला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पुरातत्त्व विभागाने माध्यमांच्या प्रतिनिधींना गोलघुमटच्या आत प्रवेशबंदी केली होती. त्यानंतर गोलघुमटचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...