आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

82 वर्षीय आईला रोज काठीने मारतो मुलगा, तरी पोलिसांना आई म्हणाली, 'त्याला माफ करा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - येथे एका 82 वर्षीय वृद्ध महिलेला तिचा मुलगा टॉर्चर करत असल्याचे समोर आले आहे. मुलगा त्याच्या आईला काठीने रोज मारहाण करतो. निमता परिसरात राहणाऱ्या या वृद्ध महिलेचे नाव आहे शांतीप्रिया. शेजाऱ्यांना जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्यांनी फेसबूकवर या महिलेवरील अत्याचाराचा व्हिडिओ पोस्ट केला. 


महिलेला दोन मुले आहेत. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर एक घर सोडून गेला. तर दुसरा आईवर अत्याचार करतोय. झोपलेल्या आईला लाथा मारून उठवतो. एका काडीने रोज आईला मारहाण करतो. वृद्ध आईला घरातील कामे करायला लावतो. शेजाऱ्यांनी फेसबूकवर टाकलेला व्हिडिओ पाहून पोलिस वृद्धेच्या मुलाला अटक करायला पोहोचले. पण तरी आईने मुलाला वाटवले आणि त्याला माफ करा असे म्हणाली. 

 
कायदेतज्ज्ञ संजय मेहरा म्हणाले की, ज्येष्ठ मातापित्यांना कायद्याने अनेक अधिकार दिले आहेत. मुलगा आई वडिलांना घराबाहेर काढू शकत नाही. घर मुलाच्या नावावर असेल तरी त्यांना उदरनिर्वाहासाठी भत्ता देणे गरजेचे आहे.  

 
वृद्ध आई वडिलांचे अधिकार
- वृद्ध आई वडिलांना त्यांच्या मुलांकडून त्यांचा सांभाळ व्हावा असा अधिकार आहे. 
- ज्या घरात ते राहतात ते त्यांच्या नावावर नसेल तरी मुले आई-वडिलांना घराबाहेर काढू शकत नाहीत.
- मुले त्यांना घरात ठेवू इच्छित नसतील तर त्यांना उदरनिर्वाहासाठी भत्ता देणे गरचे आहे. 
- हा भत्ता मुलाची कमाई आणि आई वडिलांच्या गरजांवर ठरतो. 
- ज्येष्ठ नागरिक संरक्षण अधिनियम, 2005 अंतर्गत मुलाने हाकलून दिल्यान आई वडील कारवाईची मागणी करू शकतात. 
- सीआरपीसीच्या कलम 125 अंतर्गत ते उदरनिर्वाहासाठी भत्त्याची मागणी करू शकतात. 
- त्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली जाऊ शकते. 
- मुलाने मारहाण किंवा धमकी दिल्यास पोलिसांत तक्रार करता येते. पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर दंडाधिकारी किंवा कौटुंबीक न्यायालयात दाद मागता येते. 

- मुलाने फसबून घर नावावर करून घेतले तर जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून ते परत मिळवता येते. कोर्टात यासाठी केसही करता येते.  

- उदरनिर्वाहासाठी भत्ता दिला नाही तर मुलांना एका महिन्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते. 

- मुले कोणत्याही प्रकारे वृद्ध आई वडिलांना त्रास देऊ शकत नाहीत. 

 

बातम्या आणखी आहेत...