आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 वर्षांच्या वडिलांना मुलाकडून बेदम मारहाण; परवानगीशिवाय मिठाई खाल्ल्याचा होता राग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - ज्या मुलाला लहानपणी आपल्या हातांनी मिठाई खाऊ घालून मोठे केले तो मोठा होऊन आपल्याला अशी वागणूक देईल याचा बापाने विचारही केला नव्हता. सोशल मीडियावर सध्या एका मुलाचा आपल्याच वयोवृद्ध बापाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करून एकच संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये मुलगा ज्या वडिलांना मारहाण करतोय त्यांचे वय तब्बल 80 वर्षे आहे. त्यांची चूक एवढीच की त्यांनी घरातून मिठाईचा एक तुकडा खाल्ला. त्यांनी कल्पनाही केली नव्हती, की तो छोटासा तुकडा खाण्यासाठी त्याला आपल्याच मुलाची परवानगी घ्यावी लागेल. त्याच गोष्टीचा या मुलाला राग आला होता. त्याने आपल्या वडिलांना इतक्याच कारणावरून बेदम मारहाण केली. 


'नालायक' मुलगा पोलिसांच्या ताब्यात
टाळके फिरवणारा हा व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालच्या 24 परगना जिल्ह्यातील आहे. मारहाण होत असताना शेजाऱ्यांनी तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता. नालायक मुलाचा तोच सध्या फेसबूक आणि व्हॉट्सॅपवरून पसरवला जात आहे. एका प्रसिद्ध इंग्रजी टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार, या व्हिडिओची स्थानिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली. तसेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाच्या घरापर्यंत पोहोचले. त्यांनी मुलाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...