मुलाचा मृत्यू झाला तरी घरच्यांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला, म्हणाले-त्याने आमच्यासाठी असे काही केलेच नाही, त्यामुळे त्याचा अंत्यविधी करणार नाहीत


यामुळे झाला तरूण मुलाच्या आयुष्याचा शेवट

दिव्य मराठी

Apr 22,2019 12:38:00 PM IST

मोगा(पंजाब)- एखाद्या वस्तुचे व्यसन इतके वाढू शकते, हे यावरून लक्षात येऊ शकते की, एका कुटुंबाने त्यांच्या मुलाचा मृतदेह घेण्यास नकार दिला. याचे कारणही तसेच होते, मुलाने व्यसनासाठी घरातील सामान विकले आणि त्यामुळे घरची आर्तिक स्थिती ठासाळून गेली. त्यामुळे घरात खायलापण काही नाहीये आणि मुलाचा अंत्यविधी कसा करणार हे कारण देऊन वडिलांनी मुलाचा मृतदेह घेण्यास नकार दिला.

शुक्रवारी सिटी पोलिसांनी अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याला 72 तास सिव्हील हॉस्पीटलच्या मॉर्चरीमध्ये ठेवण्यात आले. जेव्हा त्याच्या कुटुंबाचा शोध लागला आणि त्यांना मुलाच्या मृत्यूची बातमी दिली तेव्हा त्यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी पोस्टमॉर्टम झाल्यावर मृतदेह समाजसेवी संघटनेच्या स्वाधी केला.

तरूणाच्या खिशातील वोटर आयडीमुळे झाली ओळख
सिटी पोलिस स्टेशनचे सहाय्यक अधिक्षक सुखजीत सिंगने सांगितले की, मोगामध्ये बस स्टँडजवळ जोगिन्द्र सिंग चौकात डिस्पोझल टँकजवळ एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या मृतदेहाला ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. शुक्रवारी त्याच्या खिशातल्या वोटर आयडीमुळे त्याची ओळख पटली. सुखवीर सिंग गाव लालपूरा जिल्हा तरनतारन असे त्याची ओळख होती. शुक्रवारी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली, पण त्याच्या घरच्यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला सेवाभावी संस्थेच्या स्वाधी करण्यात आले.

X