आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Son Died In Road Accident, Father Distributed Helmet To People Who Came In Trayodashi

रस्ते अपघातात मुलाचा झाला मृत्यू, वडिलांनी तेराव्याला आलेल्या लोकांना हेल्मेटचे केले वाटप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेजगड - येथील महेंद्र आणि ज्योती दीक्षित यांनी मंगळवारी आपल्या मुलाच्या तेराव्याच्या दिवशी 51 जणांना हेल्मेटचे वाटप केले तसेच त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची विनंती केली.  महेंद्र यांचा मुलगा विभांशुचा 21 नोव्हेंबर रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्या विभांशुची म्हशीला धडक झाल्यानंतर पुलावरून खाली पडला होता. 


मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांना एकाच गोष्टीचे वाईट वाटत होते की, जर त्याने हेल्मेट वापरले असते तर त्याचा जीव वाचला असता. तेव्हापासून ते लोकांना बाइक चालवताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करत आहेत.  अशा प्रयत्नांमुळे जनजागृती होईल


दीक्षित कुटुंबियांच्या या प्रयत्नाचे सर्वांनीच कौतुक केले आणि हेल्मेट प्राप्तकर्त्यांनी बाइक चालवतेवेळी हेल्मेट वापरणार असल्याचे सांगितले. यादरम्यान पोलिस अधिकारी के.के. तिवारी म्हणाले की, आम्ही नेहमीच सर्वांना हेल्मेट परिधान करण्याविषयी सांगत असतो. विनाहेल्मेट पकडल्यानंतर त्यांच्याकडून दंड देखील आकारत नाहीत. मात्र अशाप्रकारच्या जागरुकतेने समाजात निश्चितच चांगला संदेश पोहोचेल.