आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीला पोत्यात घालून बेदम मारायची सावत्र आई, मोठ्या भावाने मिळवून दिला बहिणीला न्याय, आईविरुद्ध कोर्टात दिली साक्ष..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड (पंजाब)- 5 वर्षांच्या मुलीला निर्दयीपणे मारणाऱ्या सावत्र आईविरुद्ध तिच्या पतीने आणि 15 वर्षांच्या मुलाने न्यायालयात साक्ष दिली. सोमवारी जसप्रीतचा पती मनमोहन आणि मुलाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजीव जोशी यांच्या कोर्टात त्या महिलेचे कृत्य सांगितले. 


छोट्या-छोट्या कारणावरून बेदम मारायची बहिणीला

मुलाने कोर्टापुढे सांगितले की, त्याची सावत्र आई छोट्या-छोट्या कारणावरून धाकट्या  बहिणीला मारायची. अनेक वेळा रागामध्ये ती त्या चिमुरडीला पोत्यात घालून मारायची. एवढ्यावरच न थांबता कधी-कधी तर लाथा-बुक्क्यांनीही मारायची. एकदा तर तिचे डोके भिंतीवर आदळले होते. 

 

मनमोहन म्हणाला की, अनेकदा त्याने त्याच्या पत्नीला मुलीला मारू नकोस, असे सांगितले होते, पण तरीही तिने न ऐकल्यामुळे तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.

 

पतीनेच बनवला व्हिडिओ
ही घटना डिसेंबर 2017 मध्ये समोर आली. त्या मुलीच्या मारहाणीचा व्हिडिओ तिच्या वडिलांनीच शूट केला होता. मनमोहनने सांगितले की, हा त्यांचा घरातील वाद होता त्यामुळे मी जसप्रीतला अनेक वेळा मुलीला न मारण्यासाठी बजावले होते, पण तरीही तिने ऐकले नाही म्हणून मी हा व्हि़डिओ बनवून पोलिसांत तक्रार केली.  

 

बातम्या आणखी आहेत...