आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासऱ्याला मारहाण करून जावयाचा आत्महत्येचा प्रयत्न; आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नी नांदायला येत नसल्याने झाला वाद

बीड- पत्नी नांदायला येत नसल्याने जावयाने सासुरवाडीत जाऊन सासऱ्याला मारहाण करून जावयाचे विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडीत घडली. या प्रकरणी मेहुण्याने दिलेल्या तक्रारीवरून जावयाविरोधात अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. 

छत्रपती तुकाराम झाडे (३०, रा. आष्टी) असे या जावयाचे नाव आहे. त्याचे आणि पत्नीचे पटत नसल्यामुळे छत्रपती याची पत्नी माहेरी वडिलांकडे राहते. २४ जानेवारी रोजी छत्रपती याने सासुरवाडी असलेल्या सोलापूरवाडी येथे येऊन सासरे बबन मुरलीधर थोरवे (५५) आणि मेहुणा आकाश बबन थोरवे यांच्याशी वाद घातला. ‘तू माझ्या बायकोला नांदायला का पाठवत नाहीस’ असे म्हणत सासरे बबन यांना  झाडे याने मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड आणि विटाने मारहाण केली. यानंतर स्वत: विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर सासरे व जावई या दोघांनाही उपस्थित लोकांनी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आकाश बबन थाेरवे यांनी अंभोरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून छत्रपती तुकाराम झाडे याच्या विरोधात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.