आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Son In Law Killed His Mother In Law By Crushing Her Under Car

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलगी आणि जावयामधील वाद मिटवून घरी जात होती महिला, रस्त्यात जावयाने कारखाली चिरडले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपुर(बिहार)- अहियापुर परिसरातील बैरिया चाणक्यपुरीमध्ये मंगळवारी रात्री एका जावयाने आपल्या सासुला कारखाली चिरडून मारल्याची घटना समोर आली आहे. या दरम्यान त्याने मेहुणा आणि मेहुणीलाही टक्कर मारून जखमी केले, घटनेनंतर तो फरार झाला. पोलिसांनी सांगितले की, पारुच्या मठियामध्ये राहणाऱ्या कृष्णा देवी यांचा घटनास्थळी मृत्यु झाला, तर त्यांचा एक मुलगा आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. मुलाच्या तक्रारीवरून पोलिस आरोपी जावयाचा शोध घेत आहेत.


टीआय मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, मृत महिला कृष्णा देवी यांच्या मुलीचे लग्न सहा वर्षांपूर्वी मोतीपुरच्या चुमन पाण्डेयसोबत झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. कृष्णा देवी आपला छोटा मुलगा रवि शुक्ला आणि मुलगी चांदनी शुक्ला सोबत जावई आणि मुलीतला वाद मिटवण्यासाठी गेल्या होत्या. दिवसा त्यांच्यात परत वाद झाला आणि रात्री बाइकवरून घरी परत येत असताना आरोपीने आपल्या कारने त्यांना टक्कर मारली आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.