आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातले सर्व झोपल्यावर मुलगा करायचा हे काम, एका दिवशी वडिलांनी पाहिल्यावर त्यांनाही वाटला अभिमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'सोशल व्हायरल सिरीज'अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा अनेक स्टोरीज व्हायरल झाल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती असाव्यात)

 

होबार्ट - ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया स्टेटमध्ये राहणारा एक मुलगा आपल्या वयाच्या इतर मुलांपेक्षा खूप वेगळा आहे. हा टीनेजर मागच्या अनेक वर्षांपासून आजारी मुलांसाठी नेहमी आपल्या हातांनी खेळणी तयार करतो. हे सर्व काही वर्षांपूर्वी सुरू झाले होते, जेव्हा तो आपल्या शहरातील लोकल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट मुलांना क्रिसमस गिफ्ट देऊ इच्छित होता. तथापि, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, त्याच्या पालकांनी त्याला असे करू दिले नाही. परंतु यानंतरही त्याने जिद्द सोडली नाही. त्याने आपल्या पद्धतीने आजारी मुलांच्या आयुष्यात आनंद आणणे सुरू केले. परंतु जेव्हा ही गोष्ट वडिलांना कळली, तेव्हा त्यांनाही भरून आले.

 

आईवडिलांनी दिला नकार, तर मुलाने शोधली आपली पद्धत
- ही कहाणी ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट शहरात राहणाऱ्या 13 वर्षीय कॅम्पबेल रेमेस या मुलाची आहे. तो आपल्या खास कामामुळे आता जगभरात प्रसिद्ध झाला आहे.
- 4 वर्षांपूर्वी जेव्हा कॅम्पबेल 9 वर्षांचा होता, तेव्हा एका दिवशी त्याने आपल्या पालकांना विचारले की, आपण इथल्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट मुलांसाठी ख्रिसमस गिफ्ट खरेदी करायचे का?
- कॅम्पबेलच्या घरात त्याच्याशिवाय 7 आणखी मुले होती. यामुळे घराची आर्थिक स्थिती पाहून त्याची आई सोनिया आणि वडील नाथन यांनी त्याच्या मागणीला नकार दिला.
- परंतु आईवडिलांनी नकार दिला तरीही या मुलाने धीर सोडला नाही, त्याने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक जबरदस्त आइडिया शोधून काढली. आपल्या आईच्या शिवणयंत्राच्या मदतीने तो मुलांसाठी स्वत: आपल्या हातांनी सॉफ्ट टॉइज शिवू लागला. विशेष म्हणजे, त्याला खेळणी तयार करण्याचा कोणताही अनुभव नव्हता.

 

5 तासांत बनले होते पहिले खेळणे
- आपले पहिले सॉफ्ट टॉय बनवण्यात त्याला तब्बल 5 तास लागले होते. या कामासाठी त्याने इंटरनेटची मदत घेतली. यानंतर तो दरदिवशी एका आजारी मुलासाठी एक टॉय तयार करू लागला. तो दर आठवड्याला हॉस्पिटलमध्ये जायचा आणि आजारी मुलांमध्ये आनंद वाटायचा.
- हे काम तो आपल्या घरच्यांपासून लपून रात्रीच्या वेळी करायचा. परंतु, एका रात्री त्याच्या वडिलांची झोप चाळवली तेव्हा त्यांना तो शिलाई करताना दिसला. यानंतर मुलाच्या भावना समजल्यावर त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.

 

वडिलांसाठीही बनवावे लागले खेळणे
- सन 2011 मध्ये या कुटुंबावर संकट कोसळले, कॅम्पबेलचे वडील नाथन यांना कॅन्सर असल्याचे कळले. ट्रीटमेंटदरम्यान त्यांच्या पोटातून टेनिस बॉल एवढा मोठा कॅन्सर ट्यूमर बाहेर काढण्यात आला. डॉक्टर त्यांना म्हणाले की, कॅन्सर पुन्हा परतण्याचे 80 टक्के चान्सेस आहेत.
- कॅम्पबेलला माहिती होते की, जेव्हा तो आपल्या हातांनी बनवलेले खेळणे आजारी मुलांना द्यायचा तेव्हा त्याचा काय परिणाम व्हायचा. यामुळे त्याने खासकरून आपल्या वडिलांसाठीही एक टेडीबियर तयार केला. तो म्हणाला की, 'मला माहिती आहे की, तणावात कॅन्सरसारखा आजार आणखी जास्त वाढतो. यामुळे मी त्यांच्यासाठीही एक टेडीबियर बनवले, जेणेकरून ते लवकर बरे व्हावेत.'
- बहुधा कॅम्पबेलचा हा फॉर्मूला काम करून गेला. कारण त्याच्याकडून मिळालेल्या गिफ्टनंतर नाथन यांची तब्येत लवकर सुधारली आणि कॅन्सर पूर्णपणे ठीक झाला.
- कॅम्पबेलने आपला पहिला टेडी 9 वर्षे वयात तयार केला होता, यानंतर पुढच्या 3 वर्षांत त्याने 1000 मुलांना सॉफ्ट टॉय वाटलेले होते. सोबतच त्याने मुलांसाठी मदत गोळा करण्यासही सुरुवात केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

 

 

बातम्या आणखी आहेत...