Home | Maharashtra | Vidarva | Akola | Son kill his father in the case Land dispute 

वृद्ध पित्याची हत्या: मुलगा, सुनेची रवानगी कारागृहात 

दिलीप ब्राम्हणे | Update - Jan 16, 2019, 12:24 PM IST

मृत्यू हा गोठ्यात गायीला चारा घालण्यासाठी गेले असताना गायीने मारल्याने झाल्याचा बनाव दोघांनी केला होता.

  • Son kill his father in the case Land dispute 

    अकोला- ७० वर्षीय पित्याची हत्या करणारा मुलगा, सून या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. २२ डिसेंबर रोजी मुलगा विठ्ठल गंगाधर म्हैसने आणि त्याची भावजय संध्याने गंगाधर म्हैसने यांना मारहाण करून त्यांचा निर्घृण हत्या केली होती.

    विठ्ठल गंगाधर म्हैसने व त्याची भावजय संध्या म्हैसने या दोघांनी संगनमत करून गंगाधर म्हैसने (वय ७० रा. देगाव ता. बाळापूर) यांना घरात मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृत्यू हा गोठ्यात गायीला चारा घालण्यासाठी गेले असताना गायीने मारल्याने झाल्याचा बनाव या दोघांनी केला होता. मात्र गंगाधर म्हैसने यांना झालेल्या जखमी या गायीने मारल्याच्या नव्हत्या, असे पोलिस तपासात समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता गंगाधर म्हैसने यांना गायीने नव्हे तर मुलगा विठ्ठल आणि सून संध्या हीने मारल्याचे समोर आले होते. त्यावरून पोलिसांनी आधी विठ्ठलला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वडिलांना मारहाण केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची भावजय संध्या म्हैसने हिलाही सोमवारी अटक केली. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून काठीही जप्त केली आहे. त्याच काठीने गंगाधर म्हैसने यांना मारहाण करण्यात आली होती.

Trending