आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पबजीने घेतला जन्मदात्या वडिलांचा बळी, मोबाईल घेतल्याच्या रागातून मुलाने केले वडिलांच्या शरिराचे तीन तुकडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू(कर्नाटक)- PUBG मोबाईल गेमचे व्यसन किती घातक ठरू शकते हे बंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेवरुन लावता येईल. येथील एका विकृत मुलाने पबजी न खेळून दिल्याने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. घटना आज(9 सप्टेंबर)कर्नाटकातील काकतीमध्ये घडली. रघुवीर कुंभार या आरोपी मुलाने वडिलांची हत्या करुन त्यांचे शरीराचे तीन तुकडे केले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  
 
रात्रभर मुलगा पबजी खेळत होता, म्हणून वडिलांनी त्याच्याकडून मोबाईल मोबाईल काढून घेतला. मोबाईल घेतल्याच्या रागातून मुलाने  वडिलांवर हल्ला करत त्यांचा निर्घुण खून केला. यावेळी त्याने आईला दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवले आणि घरातील विळ्याने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले. रघुवीर हा तीन वेळा डिप्लोमा परिक्षेत नापास झाला होता. त्यामुळे तो कामधंदा न करता घरी बसून दिवस-रात्र मोबाईलवर पबजी गेम खेळत होता. वडील शंकर कुंभार हे तीन महिन्यापूर्वीच जिल्हा सशस्त्र पोलिस दलातून निवृत्त झाले होते. दरम्यान, घटनेची नोंद काकती पोलिसांनी केली असून वरीष्ठ पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...