आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने आपल्या आईसोबत मिळून केली सख्ख्या बापाची हत्या, आधी मारहाण केली मग दगडाने ठेचले डोके...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोहरथाना(राजस्थान)- येथील आंवलहेडा गावात शनिवारी दुपारी शेतात पेरणीवरून झालेल्या वादानंतर मुलाने आपल्या आईच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण करून हत्या केली. माय लेकाने दगड डोक्यात डोक्यात घातला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मृतदेहाजवळ बसलेल्या आई-मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.


एसएचओ धनराज मीणा यांनी सांगितले की, आंवलहेडा गावाच्या एका शेतात मृतदेह पडलेला असल्याची सूचना मिळाली. मृत व्यक्तीचे नाव मोहनलाल लोधा आहे. मृतदेहाजवळच आरोपी मुलगा आणि आई रडत बसले होते. चौकशी केल्यावर महिलेने स्वतःला मृत मोहनलालची पत्नी पानाबाई आणि युवकाने मुलगा दीपक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मृतदेहाला पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले आहे. ​​​​​​वडिलाला सोबत ठेवत नव्हते
पोलिसांनी सांगितले की, मृत मोहनलालच्या नावावार सगळी शेती आहे. त्याची पत्नी आणि मुलगा त्याला आपल्या सोबत राहू देत नव्हते. मुलाला शेतात मक्याचे पीक घ्यायचे होते, पण मोहनलाल म्हणाले की, ते त्यांना सोबत ठेवत नाहीत तर मग शेती का करू द्यायची. त्यावर वाद झाला आणि बाप-लेकात भांडण सुरू झाले. मुलाने आईसोबत मिळून वडिलांना दगडाने ठेचले,त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा आणि आईचे म्हणने आहे की, त्यांना मोहनलालला मारायचे नव्हते, पण मोहनलालने त्यांना मारहाण सुरू केल्यामुळे  बचावदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.