Home | National | Other State | son killed his father by smashing hammer on his head in Patiala Punjab

वडील मुलाच्या कॉम्प्यूटरच्या खुर्चीवर बसले म्हणून मुलाने त्यांच्या डोक्यात हातोडी मारून केली हत्त्या, 2 महिन्यापूर्वी रूममध्ये आलेल्या आईच्या अंगावरही फेकली होता होतोडी..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 12:34 PM IST

कुटुंबीय म्हणाले- तो 5-5 दिवस जेवण करत नव्हता, दिवस-रात्र कॉम्प्यूटरवर बसयचा

  • son killed his father by smashing hammer on his head   in Patiala Punjab

    पतियाळा(पंजाब)- 65 वर्षीय बलकार सिंग मुलाच्या कॉम्प्यूटर खुर्चीवर बसले म्हणून मुलगा प्रभजोत सिंग लालीने वडिलांच्या डोक्यात हातोडी मारून हत्त्या केली. घडना मंगळवारी संध्याकाळी झाली. त्यानंरत खाली येऊन बहिणीला म्हणाला- ''बापाला मी मारले, जा पाहून ये.'' त्यानंतर आई आणि बहिणींने वरच्या खोलीत गेले तेव्हा बलकार सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कुटुंबीयांनी कसेबसे त्यांना रूग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी जाऊऩ पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केले तसेच डोक्यात मारलेली हातोडीदेखील जप्त केली. बलकार यांच्या पत्नी अमरजीत कौर यांच्या साक्षीवरून पोलिसांनी हत्त्येचा गुन्हा दाखल केला आहे.

    लालीचे मामा रणजीत सिंगने सांगितले- भाच्याने बीटेक इलेक्ट्रॉनिक्समधुन केली आहे. शिक्षण झाल्यापासून तो घरीच होता. मंगळवारी संध्याकाळी त्याच्या वडिलांनी किराणा सामान आणले. त्यानंतर ते लालीच्या रूममध्ये गेले, त्यावेळी लाली बाथरूममध्ये होता. त्याने वडिलांना आपल्या कॉम्प्यूटरसमोर बसलेले पाहून त्यांच्या डोक्यात हातोडी मारली. त्यानंतर त्यानेच त्याच्या आई आणि बहिणीला ही गोष्ट सांगितली. रणजीत म्हणाले की, लालीच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला आहे. त्याचे शिक्षण सुरू होते, तेव्हा तो दोन पेपरमध्ये नापास झाला होता, तेव्हापासून त्याचे डोक्यावर परिणाम झाला होता.

Trending