Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Son killed his mother as she refusing to do his marriage

लग्न लावून देत नाही म्हणून पोटच्या पोरानेच केला आईचा खून

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 06:58 PM IST

आरोपी मोहितला अमली पदार्थांचे व्यसन लागले होते

  • Son killed his mother as she refusing to do his marriage

    सोलापूर- सोलापूरमध्य़े आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सोलापूरमध्ये एका मुलाने माझे लग्न का लावून देत नाहीत असे म्हणत, जन्मदात्या आईचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागमणी विजय कायत असे दुर्देवी मातेचे नाव असून, आरोपी मोहित विजय कायतला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


    सोलापुरातील कायत कुटुंब माळवाडीत स्थायिक झाले होते, आरोपी मोहितला अमली पदार्थांचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो उपचारासाठी सोलापूरला आला होता. येथील एका खासगी रूग्णालयात त्याने उपचार सुरू केले, त्याला पाहण्यासाठी त्याची 52 वर्षीय आई नागमणी कायत सोलापुरातील जोडभावी पेठ येथील घरी आली होती. रात्री सर्व जण झोपी गेले. सकाळी सातच्या सुमारास महिलेच्या भावाची पत्नी जोडभावी पेठेतील घरी आल्यानंतर तिने घरातील दृष्य पाहून आरडाओरड केला. यानंतर लोकांनी त्यांच्या घरात जाऊन पाहिल्यानंतर नागमणी या बेशुद्धावस्थेत आढळल्या.


    त्यांना तत्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर पोलिसांच्या चौकशीत मोहितने स्वत:च्या आईचा घरातील केबलच्या वायरने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्याने या हत्येचे दिलेले कारण धक्कादायक आहे. त्याने सांगितले की, माझे लग्न लावून दे असे मी आईला वारंवार सांगितले होते, पण ती नेहमी टाळटाळ करायची म्हणून मी तिचा खून केला.

Trending