आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरबा(छत्तीसगढ)- येथे एका मुलानेच आपल्या जन्मदात्या आईचा निघृण खून केला आहे. सांगण्यात येत आहे की, आरोपी मुलाने स्वप्नात पाहिले की, त्याच्या आईने त्याच्या छोट्या भावाचा खून केला आहे. या कारणांमुळे त्यांने धारदार शस्त्राने आपल्या आईचा खून केला आणि नंतर शरीराचे तुकडे केले. काही वर्षांपूर्वी आरोपीच्या भावाचा मृत्यु झाला होता, त्यानंतर तो जादुटोण्याच्या फंद्यात पडला होता. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण
रामाकछार गावार राहणारा 25 वर्षीय दिलीप लाल आपली 50 वर्षीय आी सुमरिया बाईसोबत राहत होता. त्याचा छोटा भाऊ आणि वडिलांचे काहि वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तो जादुटोण्याच्या फंद्यात पडला होता. त्यासाठी त्याने घरातील एका कोपऱ्य़ात साधनेसाठी जागा बनवली होती.
मीडीया रिपोर्टनुसार त्याला एक दिवस स्वप्न पडले की, त्याच्या लहान भावाचा खून त्याच्या आईने केला आहे. या गोष्टीचा राग मनात धरून त्यांने धारदार शस्त्राने आईचा खून केला आणि तिचे रक्त पिऊ लागला.
कसा झाला खुलासा
खूनानंतर घटनास्थळी शेजारी राहणाऱ्या समारीन बाई पोहचल्या आणि त्यांनी दिलीपला आईचा खून करून रक्त पिताना पाहिले. हे पाहून त्या पळून गेल्या आणि सगळ्यांना माहिती दिली. त्यानंतर गावातील लोकांनी पोलिसांत या घटनेची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना तेथे उंदराची राख आणि आरोपीच्या आईच्या अस्ती मिळाल्या. त्यासोबतच भिंतीवर रक्ताचे डाग आणि पुजेच्या जागी मांस मिळाले. खूनात वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे आणि फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.