Maharashtra Crime / दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईवर केला कुऱ्हाडीने वार, मेहकरमध्ये घडली धक्कादायक घटना


उपचारादरम्यान महिलेने सोडला जीव

दिव्य मराठी

Aug 18,2019 05:53:24 PM IST

मेहकर- येथे आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे मुलानेच आईचा डोक्यात कुऱ्हाड मारुन खून केल्याची घटना लोणार तालुक्यातील अंजनी खुर्दमध्ये काल(शनिवार) रात्री 8 च्या सुमारास घडली. याप्रकरणी आज(रविवार)सकाळी मेहकर पोलिस स्टेशनमध्ये मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


अंजनी खुर्दमध्ये राहणाऱ्या कमलबाई आत्माराम अवसरमोल (वय 64) आपल्या मुलासह राहत होत्या. आरोपी मुलगा विनोद अवसरमोल याला दारुचे व्यसन होते. शनिवारी त्याने कमलबाई यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर विनोदने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. कुऱ्हाडीच्या घावामुळे रक्तस्त्राव होवून कमलबाई गंभीर जखमी झाल्या. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ ग्रामिण रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती दीपक आत्माराम अवसरमोल यांनी मेहकर पोलिस स्टेशनला दिली. तक्रारीवरुन रविवारी सकाळी आरोपी विनोद अवसरमोलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

X