Maharashtra Crime / बायकोला माहेरी पाठवले म्हणून मुलाने घेतला जन्मदात्या आईचा जीव, कल्याणमध्ये घडली ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

बायकोला बोलवून घे अशी अमन सारखं आपल्या आईला विनंती करत होता

Sep 05,2019 04:53:00 PM IST

मुंबई- आईने सुनेला माहेरी पाठवले, तीला परत घरात येऊ देत नाही म्हणून मुलानेच जन्मदातीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना कल्याणमद्ये घडली. अमन मुल्ला या आरोपीने रागाच्या भरात घरातील हातात येईल त्या वस्तुने आईवर हल्ला चढवला, यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अमनला अटक केली आह.


परिसरातील गफूर पॅलेस नावाच्या इमारतीत अमन आपल्या कुटुंबासोबत राहतो. अमनची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली होती. अमनच्या आईने तिला जबरदस्ती माहेरी पाठवले होते. बायकोला बोलवून घे अशी अमन सारखं आपल्या आईला विनंती करत होता. मात्र आई काही ऐकत नव्हती. एके दिवशी याच विषयावरुन आई-मुलात वाद झाला, हा वाद खूप वाढला. त्यानंतर त्याच्या घरातून महिलेचा जोरात ओरडण्याचा आवाज येत होता.

आवाज ऐकून परिसरातील अनेक लोक बिल्डींगच्या खाली जमा झाले मात्र कोणीही वर जायला तयार नव्हतं. थोड्याच वेळात एक महिला आपल्या दोन मुलांसह शेजारच्या घरात जाऊन बसली. त्यावेळी अमन मुल्ला या तरुणाने आपली आई रुक्साना यांच्यावर घरात जी काही वस्तू सापडेल, त्या वस्तूने हल्ला करत जीव घेतला. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत अमनने आईची निर्घृण हत्या केली होती आणि तो एका कोपऱ्यात बसला होता. घडलेल्या या ह्रदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हदरुन गेले आहे.

X