आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्डर : आईची हत्या करून प्रेयसीला नेऊन दिले दागिने, तिने जे केले त्याचा प्रियकराला अंदाजच नव्हता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आईचीच क्रूरपणे हत्या केली. नंतर तो घरातील सर्व दागिने आणि पैसे घेऊन प्रेयसीकडे गेला. त्याने सर्वकाही तिला दिले. प्रेयसीने आधी सर्वकाही घेतले. पण नंतर तिने विचारले की, हे सर्व कुठून आणले आणि तुझ्या कपड्यावर रक्त कसे लागले आहे. त्यानंतर त्याने तिला सर्वकाही सांगितले. ते ऐकूण तिला धक्काच बसला. तिने लगेच दागिने आणि पैसे त्याच्या अंगावर फेकले आणि त्याला घरातून हाकलून लावले. जो स्वतःच्या आईला मारू शकतो, तो कोणाचाही जीव घेऊ शकतो असे ती म्हणाली. 


मोठ्या मुलाने दाखल केली केस 
60 वर्षीय भगवती पांडे विधवा होत्या. त्यांचा मोठा मुलगा मुकेश बीएसएफमध्ये आहे. तर लहान मुलगा नवीन आईबरोबर घरीच राहतो. 30 सप्टेंबरला भगवती यांचा मृतदेह घराच्या गॅलरीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यावर कपाट आणि लॉकर उघडे होते. मोठा मुलगा मुकेशने हत्या आणि चोरीचा खटला दाखल केला होता. नवीन घरातून बेपत्ता होता, त्यामुळे पोलिसांना सर्वात आधी त्याच्यावर संशय आला. 


नवीनला एटीएम समजायची प्रेयसी 
बुधवारी पोलिसांनी नवीनला पकडले तेव्हा त्याने अनेक खुलासे केले. त्याचे अंजली नावाच्या मुलीबरोबर अफेयर होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पण अंजलीला फक्त पैसे उकळायचे होते. ती सीमा नावाच्या एका मुलीबरोबर राहत होती. दोघी लग्नाच्या नावाखाली त्याच्याकडून पैसे उकळत होत्या. मला पूर्ण दागिने तयार करून देशील तेव्हाच लग्न करेल असे प्रेयसी त्याला म्हणाली होती. त्यानंतर त्याने आईकडे पैसे आणि दागिने मागण्यास सुरुवात केली. आईने नकार दिला तेव्हा त्याने क्रूरपणे आईची हत्या केली. पोलिसांनी त्याची गर्लफ्रेंड आणि दुसऱ्या एका महिलेला अटक केली असून पैसे आणि दागिनेही जप्त केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...