आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकुलत्या एक मुलाने पॅरालिसिस झालेल्या जन्मदात्याला सोडले स्टेशनवर, भीक मागून पोट भरण्यास मजबूर झाला 70 वर्षीय पिता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हरिद्वार : अनेक महिन्यांपूर्वी एका मुलगा आपल्या जन्मदात्याला हरिद्वार येथे सोडून पळून गेला. सुनील महेंदु (वय 70 वर्ष) असे पीडित व्यक्तीचे नाव असून ते नाशिक येथील रहिवासी आहेत. अनेक महिन्यांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना हरिद्वारमध्ये सोडून निघून गेला होता. महेंदु सांगतात की, मुलगा सोडून गेल्यानंतर मी ठिकठिकाणी भटकत राहिलो. पण काही उपयोग झाला नाही. अखेर थकल्यानंतर रेल्वे स्टेशनलाच आपले घर बनवले. यादरम्यान वृद्धाला भीक मागून आपले जीवन काढवे लागले होते. पण आता एका समाजसेविकेच्या मदतीने त्यांना आसरा मिळाला आहे.  

 

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, महेंदु यांना पॅरालिसिस असल्यामुळे उपचाराच्या नावाने काही महिन्यांपूर्वी हरिद्वार येथे आणले होते. औषधी आणायला जात असल्याचे सांगत गेल्यानंतर तो कधीच परत आला नाही. यादरम्यान महेंदु हरिद्वारमध्येच ठिकठिकाणी भटकत राहीले. नंतर त्यांनी रेल्वेच्या हेल्पलाइनकडे मदतीची याचना करत आपली आपबीती सांगितली.

- यानंतर हेल्पलाइनद्वारे वृद्धाने सांगितलेल्या नाशिच्या पत्त्यावर इंटरनेटने ट्रेस करण्यात येऊन स्थानिक पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. आपला मुलगा आपल्याला न्यायला येईल अशी महेंदु यांना आशा आहे. 


आता मिळाला आसरा


- समाजसेविका पुनीता वाचपेयी यांच्या प्रयत्नांनी महेंदु यांना वृद्धाश्रमात निवारा मिळाला आहे. महेंदु झी टीव्हीमध्ये अकाऊंटंट म्हणून कार्यरत होते. 

- उत्तराखंड लोकसेवा आयोगाच्या उपसचिव पुनीता यांना संबंधित माहिती मिळताच स्टेशनवर जाऊन महेंदु यांची भेट घेतली. स्टेशवरील हेल्पलाइन कर्मचाऱ्यांकडून संबंधीत संपूर्ण माहिती जाणून घेतली. गेल्या अनेक महिन्यांपासून हा वृद्ध व्यक्ती स्टेशनवरच राहत असल्याचे हेल्पलाइन स्टाफने सांगितले. महेंदु यांची त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी पोलिसांची देखील मदत घेण्याच येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...