आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या स्वभावाला कंटाळून मुलाने मित्राच्या मदतीने केली हत्या, झोपेच्या गोळ्या देऊन चाकूने केले 16 वार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - लालपूर परिसरात महिलेचा मृतदेह आढळेल्या प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, मीरा जयस्वाल यांची हत्या त्यांचा मुलगा अमितनेच केल्याचे समोर आले आहे. अमितने निर्घृणपणे आईला मारले. आरोपीला त्याचे दोन मित्र 2 धीरज आणि शिवमने मदत केली. तिघांनी आधी आईला झोपेची गोळी दिली आणि नंतर वीजेचा शॉक आणि चाकून 16 वार करत महिलेची हत्या केली. 19 सप्टेंबरला डेडबॉडी फेकली. 


आईने स्वतःच्या दुकानात मुलाला बनवले नोकर 
- एसएसपींनी सांगितले की, तिन्ही आरोपींना पाळत ठेवून अटक केली. 
- अमितने सांगितले की, त्याचे वडील अनिल कुमार यांनी दोन वर्षांपूर्वी आईच्या हुकूमशाहीला कंटाळून घर सोडले होते. आईने इलेक्ट्रॉनिकचे दुकान सुरू केले होते. त्यात ती अमितला नोकराप्रमाणे काम करायला लावायची. 
- जून 2018 मध्ये अमितचे लग्न अंकिताबरोबर झाले होते. पण तिच्याशी भांडण करत आईने तिलाही पळवून लावले होते. त्यामुळे पत्नी गेल्यानंतर माझी मानसिक अवस्था बिघडली होती असे अमित म्हणाला. 


दोन कारणांमुळे केली हत्या 
अमित म्हणाला की, त्याने दोन कारणांमुळे आईची हत्या केली. पहिले कारण म्हणजे त्याला स्वतःच्या दुकानात नोकराप्रमाणे राहायचे नव्हते. तर दुसरे कारण म्हणजे त्याला त्याच्या पत्नीला आईने पळवून लावल्याचा बदला घ्यायचा होता. सर्वात आधी त्यांनी उंदीर मारण्याचे औषध देण्याचा निर्णय घेतला. पण हिम्मत झाली नाही म्हणून दुकानातील अकाऊंटंट धीरज आणि दुसरा एक मित्र शिवमला त्याने सोबत घेतले. प्लाननुसार 17 सप्टेंबरला सर्वात आधी त्यांनी आईला झोपेच्या 15 गोळ्या दिल्या. पोलिसांना संशय यावा म्हणून, शिवम त्याच दिवशी आईचा मोबाईल घेऊन रॉबर्ट्स गंज आणि मिर्झापूरला गेला. दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबरच्या सायंकाळी शिवम परत आला. 


18 तारखेला रात्री आईला परत झोपेच्या 20 गोळ्या दिल्या 
वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणाले की, आई झोपल्यानंतर अमित आणि धीरज यांनी त्यांना 5 वेळा वीजेचा धक्का दिला. अमितने ओरडल्यानंतर आईच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने 6 वार केले. नंतर धीरजने 10 वार केले. रात्री खोलीतील रक्त स्वच्छ करून डेडबॉडी प्लास्टीकच्या पिशवीमध्ये टाकून ठेवली. 


19 सप्टेंबरला रेकी करून मृतदेह फेकण्यासाठी जागा शोधली 
आरोपीने सांगितले, त्याने दिवसा कपाटाची चावी तयाप करणाऱ्याला बोलावून किल्लीही बनवून घेतली होती. त्याला कपाटात एक लाख पंधरा हजार रुपये मिळाले. त्यांनी बाजारातून मोठा बॉक्स खरेदी करून आणला. त्यानंतर मृतदेह 19 तारखेच्या रात्री बॉक्समध्टे ठेवून त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर बॉक्स घेऊन परत घरी आले. घरात लावलेल्या 15 सीसीटिव्ही कॅमेर्यांचे डीव्हीआर फॉरमॅट करून तोडले होते. 

बातम्या आणखी आहेत...