आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीस अवघे चार दिवस बाकी असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांचे सुपूत्र समीर द्विवेदी यांनी आज(मंगळवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर जनार्दन द्विवेदी यांनी मोदी सरकारचे कौतुक केले होते. यावर ते म्हणाले होते की, माझे राजकीय गुरू राम मनोहर लोहिया नेहमी कलम 370 लागू करण्याच्या विरोधात होते.
आपल्या भाजप प्रवेशाबाबत समीर म्हणाले की, "मी पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामुळे मला भाजपमध्ये येण्याची प्रेरणा मिळाली." मुलाच्या भाजप प्रवेशावर जनार्दन द्विवेदी म्हणाले की, "मला याबाबत काहीच माहिती नाही. जर तो भाजपमध्ये सामील होत असेल, तर तो त्याचा खासगी निर्णय आहे."
जनार्दन यांना मागच्या वर्षी महासचिव पदावरुन हटवण्यात आले होते
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या तयारीसाठी अनेक समित्यांची स्थापना केली आणि निवडणूक व्यवस्थापन समिती आणि प्रचार समितीमध्ये माजी महासचिव जनार्दन द्विवेदी यांना जागा देण्यात आली. 30 मार्च 2018 ला जनार्दन यांना संघटनेच्या महासचिव पदावरुन हटवण्यात आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.