आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या चितेशेजारी मुलाने स्कॉर्पिओवर टाकले डिझेल..गाडीमध्ये बसला अन् घेतले स्वत:ला जाळून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- तीन दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या आईला अग्नी दिलेल्या ठिकाणी जाऊन एका तरूणाने स्कार्पिओ गाडीत स्वत:ला बंद करून पेटवून घेतले. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे रविवारी राञी हा प्रकार घडला. गजानन अण्णाराव कोंडलवाडे (27) असे या तरूणाचे नाव आहे.

पोलिस आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरुर ताजबंद येथील सत्यभामाबाई अण्णाराव कोंडलवाडे यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी त्यांच्याच शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. रविवारी सकाळी दूध घालण्याचा विधीही पार पडला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्याला आईचा विरह सहन होत नव्हता. त्यातच तो रविवारी रात्री बाहेर गेला आणि घरी परतलाच नाही. राञी साडे अकराच्या दरम्यान तो स्वत:ची स्कार्पिओ गाडी घेऊन (एम. एच. 24. ई 5750 ) चोबळी रस्त्यावर आईवर जेथे अंत्यविधी झाला तेथे गेला. तेथे त्याने गाडीवर डिझेल टाकले. स्वत:ला कोंडून घेतले आणि पेटवले. सोमवारी सकाळी तेथे केवळ गाडीचा सांगडा तेवढा उभा होता. गजाननच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी असा परिवार आहे.

दरम्यान, गावातीलच काही जणांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजाननचे दोन विवाह झाले होते. त्यावरून काही वादही झाले आहेत. त्या वादाचा या घटनेशी काही संबंध आहे की नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी अहमदपूर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मिक मुत्यूची नोंद झाली असून गजाननची आत्महत्या की हत्या याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एम गित्ते करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...