आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने 1300 रुपयांत रेल्वेने वाराणसीला नेला पित्याचा मृतदेह, अॅम्ब्युलन्सने लागले असते 40 हजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - एका तरुणाने त्याच्या वडिलांचा मृतदेह रेल्वेतून वाराणसीला नेला. त्याच्या आईने अंत्यसंस्कार वाराणसीला करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रेल्वेतून मृतदेह नेण्यासाठी फक्त 1300 रुपये खर्च आला. तर अॅम्ब्युलन्सचा चार्ज 40 हजारांच्या आसपास आहे. 


मुलाने पूर्ण केली आईची इच्छा 
- बिंदेश्वर प्रसाद वत्स यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने पतीच्या मृतदेहावर कुटुंबातील परंपरेनुसार वाराणसी येथे अंत्यसस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. 
- बिंदेश्वर प्रसाद यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला होता. आईच्या इच्छेनुसार मुलाने मृतदेह पाठवण्यासाठी सेवा फाऊंडेशनचे अशोक गोयल आणि महासचिव ललित शर्मा यांच्याशी संपर्क केला. 
- संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मृतदेह उधनाहून वाराणसीला जाणार्या भोलेनगरी एक्सप्रेसद्वारे पाठवण्याची माहिती दिली. त्यानुसार बुकींग करण्यात आली. 
- सायंकाळी मृतदेह शवपेटीत ठेवून उधना स्टेशनपर्यंत पोहोचवण्यात आला. उधना स्टेशनहून मृतदेह पाठवण्याची ही पहिलीच घटना आहे. 


लगेज बोगीमध्ये मृतदेह ठेवून किल्ली घेऊ शकता 
मृत्यूनंतर बिंदेश्वर यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. त्याठिकाणी मृतदेह वाराणसीला नेण्याबाबत चर्चा झाली. कोणीतरी सांगितले की, रेल्वे सुटण्याच्या तीन तास आधीपर्यंत रेल्वेत बुकींग करून रेल्वेद्वारे मृतदेह पाठवता येतो. त्यानंतर बुकींग करून रेल्वेच्या बोगीत मृतदेह ठेवला आणि त्याची किल्ली नातेवाईकांना दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...