• Home
  • News
  • Sona Mahapatra gets angry on Shahid Kapoor's film 'Kabir Singh'

Bollywood / शाहिद कपूरचा चित्रपट 'कबीर सिंह' वर भडकली सोना महापात्रा, ट्विटर केली सडकून टीका

टीव्ही अॅक्टर नकुल मेहतालाही खूप सुनावले

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 04:24:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड सिंगर सोना महापात्राला शाहिद कपूरचा चित्रपट 'कबीर सिंह' अजिबात आवडला नाही. तिने या चित्रपटामुळे शाहिद, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि टीव्ही अभिनेता नकुल मेहताला ट्विटरवर खूप सुनावले. सोना महापात्राने ट्वीट केले की, तिला शाहिदची पुरुष प्रधान भूमिका मुळीच आवडली नाही.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी 'कबीर सिंह' चित्रपटाचे कुटून करताना एक ट्वीट केले होते, जे आता त्यांनी डिलीट केले आहे. या ट्वीटवर उत्तर देत सोना महापात्राने लिहिले, ‘तुम्ही महिला विरोधी आणि पित्रसत्तात्मक कहाणी नोटिस नाही केली ? केवळ इंटेन्स अॅक्टिंग नोटिस केली ? हे खरंच खूप परेशान करणारे आहे. तुम्ही तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात, मी हैरान आहे की जेव्हा भारतात महिलांच्या परिस्थितीचा मुद्दा असतो तेव्हा आपण काय अपेक्षा केली पाहिजे.’

सोना महापात्राचे ट्वीट…

सोना महापात्राने एवढेच बोलून थांबली नाही. तर टीव्ही अॅक्टर नकुल मेहताने ‘कबीर सिंह’ चित्रपटाच्या कौतुकास्तव केलेल्या एका ट्वीट ला उत्तर देत सोनाने लिहिले, ‘आपण खूप परेशान करणाऱ्या, खोल आणि भयंकर राजकारणाला मागे कसे सोडू शकतो ? अभिनेत्याची रोल निवडताना कोणतीच जबाबदारी नसते का ? की आपण सगळे हेच बनत चाललो आहोत का ? महत्वाकांक्षांचे जीव ?’

X
COMMENT