आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोना महापात्राने महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणींना लिहिले ओपन लेटर, अनू मलिक वादात हस्तक्षेप करण्याची विनंती  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः गायिका सोना महापात्राने महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना ओपन लेटर लिहून अनू मलिकच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. खरं तर, मंगळवारी इराणी म्हणाल्या होत्या...., सरकारने लैंगिक गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्यास सुरुवात केली आहे. यावरून सोनाने त्यांचे आभार मानले आहेत आणि लैंगिक छळाच्या आरोपींना मदत करणाऱ्या संस्थांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

सोनाचे ओपन लेटर... 
प्रिय स्मृती इराणी... लैंगिक गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्याच्या पुढाकाराबद्दल आभार. मात्र लैंगिक गुन्हेगारांच्या आरोपांनंतरही काही लोकांना काम देणाऱ्या संस्थांचे काय ? त्यापैकी सोनी टीव्हीदेखील एक आहे, ज्यांनी बऱ्याच महिलांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करत अनू मलिक यांना कामावर घेतले आणि राष्ट्रीय टीव्हीवर 'इंडियन आयडॉल' साठी त्यांना परीक्षक म्हणून नेमले. लैंगिक शोषण झालेल्या महिलांचे काय ? पूर्वीपासून जी व्यवस्था सुरू आहे, यात बदल व्हायला हवा, अनू मलिकसारख्या गुन्हेगारांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे. त्यांना आणखी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जात आहे. यामुळे देशात चुकीचा संदेश जात आहे.

बातम्या आणखी आहेत...