आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 वर्षांच्या अॅक्ट्रेसने 50 वर्षांच्या बॉबी देओलला कडेवर उचलले तेव्हा... सगळेच हैराण! फोटो झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हुमा कुरेशीने शुक्रवारी रात्री एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत मोठ्या संख्येने सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. याच पार्टीतील एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल ठरत आहे. यामध्ये 31 वर्षांची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 50 वर्षांच्या बॉबी देओलला चक्क कडेवरच उचलून धरले. सोनाक्षीने हा स्टंट थट्टा मस्करीत केला. परंतु, सोनाक्षीने हे सर्वच अचानक केल्याने बॉबी सुद्धा घाबरला आणि आस-पासचे सगळेच हैराण झाले. पार्टीत सोनाक्षीने ब्लॅक अॅन्ड व्हाइट स्ट्रिप्स ऑफ शोल्डर गाउन घातला होता.

 

- उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकताच सोनाक्षीवर एका इव्हेंट कंपनीने फसवणुकीचा आरोप केला होता. तिच्यावर 37 लाखांच्या फसवणुकीचे आरोप होते. तिला या प्रकरणात अटकही होणार होती. परंतु, ऐनवेळी कोर्टाने दिलासा दिला. प्रत्यक्षात, सोनाक्षीला फी दिल्यानंतरही ती एका इव्हेंटमध्ये पोहोचली नव्हती.
- सोनाक्षी सिन्हाचे 'कलंक' आणि 'मिशन मंगल' हे दोन अपकमिंग सिनेमा आहेत. 'कलंक' याच वर्षी रिलीझ होत आहे. तर 'मिशन मंगल' ची शूटिंग अजुनही सुरू आहे. सोबतच, बॉबी देओलचा अपकमिंग चित्रपट 'हाउसफुल 4' चे चित्रीकरण सुरू आहे. याच वर्षी तो ऑक्टोबरमध्ये पडद्यावर येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...