आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonakshi Sinha Had 90 Kg Weight Reduced Weight Due To Salman's Advice For Debut.

Birthday Special : कधीकाळी 90 किलोची होती सोनाक्षी सिन्हा, डेब्यूसाठी सलमानच्या सल्ल्याने कमी केले वजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सोनाक्षी सिन्हा 32 वर्षांची झाली आहे. 2 जून 1987 ला मुंबईमध्ये जन्मलेली सोनाक्षीने कधी विचार नव्हता केला की, ती अभिएन्ट्री होईल. 2010 मध्ये तिने सलमान खानच्या अपोजिट फिल्म दबंगमधून बॉलिवूड डेब्यू केला होता. चित्रपटात येण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन सुमारे 90 किलो असायचे. सलमान खानच्या म्हणण्यानुसार, तिने आपले वजन काम केले. 

 

डेब्यूसाठी 30 किलो वजन कमी केले होते... 
- सोनाक्षीने आपले करियर कॉस्ट्यूम डिजायनर म्हणून सुरु केले होते. ती अभिनेत्री बनू इच्छित नव्हती. पण सलमान खानच्या म्हणण्यानुसार, तिने चित्रपटात करिअर करायचे ठरवले. सोनाक्षीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते, मी सलमानची खूप आभारी आहे त्याने मला प्रोत्साहित केले आणि मी वजन कमी करण्याचा विचार केला. त्याच्या सांगण्यावरुनच मी स्वतःवर लक्ष देण्यास सुरुवात केली असे म्हटल्यास वावगे होणार नाही. चित्रपटात एनटासाठी सोनाक्षीने आपले 30 किलो वजन कमी केले होते.  
- सोनाक्षीने सांगितले की, वजन कमी करणे हे सोपे काम नाही. हा प्रवास अतिशय खडतर होता. तिला जिम अजिबात आवडत नव्हती. तिला जिमची अलर्जी होती. पण तिने सांगितले होते की, तिने एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती ती करूनच राहते आणि तिने तसेच केले. 

 

जिममध्ये गेल्यानंतर तिने कधीच वजन चेक केले नाही... 
सोनाक्षी सिन्हा ने इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, एक्सरसाइज करणे आणि जिमला जायला सुरुवात केल्यानंतर तिने कधीच आपले वजन चेक केले नाही. नियमित एक्सरसाइज केल्याने मलाच जाणवायला लागले की परिणाम होऊ लागला आहे. मी फिट असल्याचे मला दिसू लागेल. सोनाक्षीने वजन कमी करण्यासाठी शाहिद कपूरचा फिटनेस ट्रेनरचा सल्ला घेतला. त्याने कार्डियो एक्सरसाइज, सायकलिंग, स्विमिंग, टेनिस खेळणे, जिम, हॉट योगा असे विविध प्रकार तिच्याकडून करुन घेतले. 

 

'मेरा दिल लेके देखो' ची कॉस्ट्यूम डिजायनर होती... 
सोनाक्षीने तिचे शालेय शिक्षण आर्य विद्या मंदिर, मुंबई येथून पूर्ण केले. तर SNDT युनिव्हर्सिटीतून तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'मेरा दिल लेके देखो' सिनेमासाठी कॉस्ट्युम डिझाइनर म्हणून सोनाक्षीने करिअरची सुरुवात केली होती. 2008पासून 2009पर्यंत लॅक्मे फॅशन वीकवर रॅम्प वॉक करताना दिसली होती.

 

या चित्रपटांत केले आहे काम... 
2010 मध्ये सोनाक्षी चित्रपटांकडे वळली. आतापर्यंत सोनाक्षीने 'दबंग', 'राउडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'दबंग-2', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बुलेट राजा', 'आर राजकुमार' 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी', 'अॅक्शन जॅक्शन', 'तेवर', 'अकीरा' आणि 'फोर्स-2' या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने 'यमला पगला दीवाना फिर से',  'रेस 3' आणि 'टोटल धमाल' मध्ये स्पेशल अपिअरन्स दिला आहे. लवकरच ती 'दबंग'च्या तिसऱ्या पार्टमध्ये सलमानच्या अपोजिट  ,याव्यतिरिक्त ती 'मिशन मंगल' मध्येही काम करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...