आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा क्राइम थ्रिलर वेबसीरीजने डिजीटल डेब्यू करत आहे. सोनाक्षीची ही वेबसीरीज अॅमेझॉन प्राइमची ओरिजनल सीरीज 'फॉलेन' आहे. रीमा कागतीच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या वेबसीरीजमध्ये गुलशन देवैया, सोहम शाह, विजय शर्मा आणि मेजल व्यासदेखील दिसणार आहेत. या सीरीजचे प्रोडक्शन एक्सेल मुव्हीज आणि टायगर बेबी फिल्म्स एकत्र करत आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो...
सोनाक्षीने या सीरीजमध्ये काम करत असलेल्या संपूर्ण टीमसोबतचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तिने लिहिले, "नवी सुरुवात, अॅमेझॉनसोबत आमची नवी सीरीज, या अद्भुत प्रतिभावंत टीमसोबत काम करण्यासाठी एक्सायटेड आहे."
हे आहेत सोनाक्षीचे अपकमिंग प्रोजेक्ट्स...
सोनाक्षीच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती आता 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे. 'भुज'चे दिग्दर्शन अभिषेक दुधइया करत आहेत. अजय देवगण लीड रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटात संजय दत्त, शरद केळकर, एमी विर्क, प्रणिता सुभाष आणि नोरा फतेहीदेखील आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.