आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणमध्ये 'हिरकणी'चे वर्चस्व, सोनाली फेवरेट अभिनेत्री तर ललित प्रभाकर ठरला फेवरेट अभिनेता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा अवॉर्ड सोहळा गुरुवारी रात्री मुंबईत पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात 11 विविध श्रेणींमधील पुरस्कार देण्यात आले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात 'हिरकणी' या चित्रपटाचे वर्चस्व दिसले. या चित्रपटाला तीन अवॉर्ड मिळाले. या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री ठरली. तर हाच चित्रपट महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट ठरला. याशिवाय अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटासाठी फेवरेट सहकलाकाराचा अवॉर्ड आपल्या नावी केला.

'आनंदी गोपाळ' या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता ललित प्रभाकरला फेवरेट अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाला.

अभिनेता अंकुश चौधरी 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाइल आयकॉन' ठरला.

'खारी बिस्किट' या चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय जाधव फेवरेट दिग्दर्शक ठरले.

अमेय वाघ आणि आदिनाथ कोठारे यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.