आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 ‘विक्की वेलिंगकर’चा थरारक ट्रेलर रिलीज, वेळेचं कोडं सोडवण्यात 'ती' यशस्वी होईल का!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

#VickyVelingkar #trailerlaunch

A post shared by Sangram Samel (@sangramsamel) on

या सिनेमामध्ये विक्कीची भूमिका सोनाली कुलकर्णी हिने साकारली असून स्पृहा जोशीने विद्या, संग्राम समेळने हॅकर मित्राची तर रमा जोशी यांनी पबजी आजीची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे यांच्यादेखील महत्त्वाच्या  भूमिका आहेत. “विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे,” असे चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी  सांगितले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, लोकीज स्टुडिओ आणि डान्सिंग शिवा प्रॉडक्शन यांनी केली आहे. 'विक्की वेलिंगकर' येत्या 6 डिसेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.